Skip to content

Nashik Crime | निफाडमध्ये दुकान मालकाला मारहाण करत, लाखोंची रोकड केली पसार


Nashik Crime |  कुंभारी-पंचकेश्‍वर (ता. निफाड) ह्या रस्त्यावर शुक्रवार (दि. २४) रोजी रात्री झालेल्या लुटमारीत चोरट्यांनी दोन लाख २७ हजार रुपयांची रोकड पसार केली आहे.

वाटमारी चोरट्यांनी संबंधित व्यक्तीला बेदम मारहाणदेखील केली आहे. सोमनाथ मुरलीधर गिते (रा. पालखेड मिरचीचे) हे दिवसभरातील त्यांच्या दुकानातील व्यवसायाची रोकड घेऊन रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीहून कुंभारी-पंचकेश्‍वर यामार्गे पालखेडला त्यांच्या घरी जात होते.

Manoj Jarange | केस पांढरे करून उपयोग काय; भुजबळांच्या भाषणावर जरांगेंच प्रत्युत्तर

दरम्यान, वाटेतील भवानी मंदिर येथे ते दर्शनासाठी थांबले असता, चेहऱ्यावर मास्क लावले दोन जण तिथे आले. त्यांनी गिते यांना दांड्याने बेदम मारहाण केली.

त्यामुळे गिते हे खाली कोसळले. जखमी गिते यांनी मारेकऱ्यांशी झटापटही केली. दरम्यान, चोरट्यांनी गिते यांच्या डोक्याला पिस्तूल लावून त्यांच्याकडील दोन लाख २७ हजारांची रोकड घेऊन फरार झाले.

जखमी गिते यांच्यावर पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून, पोलिस निरीक्षक अशोक पवार हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.

Chhagan Bhujbal | मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणात 85 टक्के मराठे; भुजबळांची आकडेवारी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!