Manoj Jarange | केस पांढरे करून उपयोग काय; भुजबळांच्या भाषणावर जरांगेंच प्रत्युत्तर

0
18

Manoj Jarange |  ‘वय झाल्यामुळे भुजबळ असं बोलतात, त्यांचे केस पांढरे होऊन उपयोग काय, जर दुसऱ्या समाजाबद्दल त्यांच्यात आकस असेल.’ असं म्हणत मनोज जरांगे यांनी हिंगोलीतील मंत्री छगन भुजबळांच्या भाषणावर प्रत्युत्तर दिलेलं आहे.

हिंगोली येथे झालेल्या आजच्या ओबीसी एल्गार सभेतून छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर चांगलीच टीका केली होती.  “मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्याचे जेवढे केस पिकलेत तेवढी मी आंदोलनं केलीत, असं भुजबळांनी यावेळी  बोलताना म्हटलं होतं.

यावर जरांगे यांनी “तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काही उपयोग नाही, असं म्हणत भुजबळांना प्रत्युत्तर दिले आहे.  सध्या राज्यात सुरु असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद चांगलाच पेटला असल्याचे बघायला मिळत आहे.

तसेच भुजबळ व मनोज जरांगे यांच्याकडून एकमेकांवर खालच्या स्तरावरही टीका होत असल्याचं दिसत आहे.

Chhagan Bhujbal | मोदींनी दिलेल्या 10 टक्के आरक्षणात 85 टक्के मराठे; भुजबळांची आकडेवारी

कशाला केस पांढरे केलेत, जरांगेंचा सवाल

भुजबळांना काही माहित नाही, मग केस पांढरे कशाला केलेत, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे. भुजबळांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरही जरांगेंनी उत्तर दिलं आहे.

भुजबळांची आंदोलनं ही अशीच असतात वाटतं, ते बीडमध्ये अश्रू पुसायला गेलेत, मग अंतरवाली सराटीमध्ये का आले नव्हते. भुजबळांचे केस पांढरे झालेत, पण त्याचा काही उपयोग नाही, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Crime News | नकार दिला म्हणून, मुलीच्या आई-बापाला जाळले; 22 वर्षानंतर आरोपी ताब्यात


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here