जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना यापुढे सौरउर्जेवर

0
2

द पॉईंट नाऊ: विजेचा खेळखंडोबा, बील न भरल्यामुळे खंडित होणारा पाणीपुरवठा याची सर्वच ग्रामपंचायतींना भेडसावणाऱ्या समस्येचा विचार करता, सर्व पाणीपुरवठा योजनांवर सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून ग्रामपंचायतींचे कार्यालये, शाळांनाही त्यातून वीजपुरवठा कण्यात यावा, यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पारंपरिक ऊर्जा विभागाला देण्यात आल्या आहेत.मध्यंतरी वीज कंपनीने बिले थकलेल्या ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही केली होती.

त्याअनुषंगाने आमदार माणिकराव कोकाटे यांनी नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून सिन्नर तालुक्यातील दोन पाणीपुरवठा योजनांसाठी सौरऊर्जा बसविण्याचे मंजूर झालेले असतानाही संबंधित विभाग एकमेकांवर चालढकल करीत असल्याने या पारंपरिक ऊर्जासाठी निधीची तरतूद करूनही हा पैसा कोठे खर्च होतो, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मेडा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र त्यावर कोणीही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

जिल्ह्यातील नळ पाणीपुरवठा योजनांना विजेचा प्रश्न कायमच भेडसावतो, परिणामी पाणी असूनही वापर करता येत नाही. पाणीपुरवठा योजनांवर सौरऊर्जेचे प्रकल्प तयार करण्यात यावे, साधारणतः वीज कंपनीच्या सबस्टेशनजवळ हा प्रकल्प उभा केल्यास अतिरिक्त वीज देखील वीज कंपनीला देता येईल, असे मत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले. त्यावर सहमती होऊन जिल्ह्यातील किती पाणीपुरवठा योजना आहेत, त्यावर सौरऊर्जा बसविता येईल, याचा अभ्यास करून प्रस्ताव महिन्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या सौरऊर्जेचा वापर गावातील ग्रामपंचायतींची कार्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही जोडून विजेचा वापर कमी करता येईल, अशी सूचनाही मांडण्यात येऊन त्याला साऱ्यांनीच मान्यता दिली.

■ बोटक्लबला २० लाखांचे बील या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या गंगापूर धरणानजीकच्या बोटक्लब, रिसॉर्टला दरमहा २० लाखांचे वीजबिल येते.

■ त्यामुळे या ठिकाणीही सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यास वीजबिलांचा प्रश्न सुटेल, असे सांगून नव्याने तयार करण्यात आलेल्या त्र्यंबक मेळा बसस्थानकावर देखील सौरऊर्जा प्रकल्प उभा करण्यात यावा, अशी मागणी केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here