Skip to content

रिक्षावाल्याने युवतीला फरफटत नेले ; घटना सीसीटीव्हीत कैद


ठाण्यात एका 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी एका रिक्षाचालकाने विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केले. तिने विरोध केला असता आरोपीने तिला जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेचा व्हिडिओ सकाळी 6:45 वाजता सोशल मीडियावर आला.

युवतीला ऑटोवाल्याकडून ओढले जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. ऑटो चालकाने आधी विनयभंग केला आणि मुलीने त्याला पकडल्यावर ऑटोचालकाने तिला ओढून नेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ निरीक्षक जयराज रणवरे यांनी सांगितले की, विद्यार्थिनी तिच्या कॉलेजमध्ये असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ऑटोरिक्षा चालकाने तिचा विनयभंग केला आणि विद्यार्थिनीने त्याला पकडले तेव्हा ऑटोचालकाने तिला ओढण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने त्याला सोडले नाही.

अर्धा किलोमीटर फरफटत नेले
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थिनीला रिक्षासह सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत ओढले गेले आणि खाली पडल्यानंतर आरोपी चालक पळून गेला. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून कलम 354 आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार ऑटोरिक्षा चालकाला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी नौदलातील अभियंत्यावर बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. नौदलात कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १९ वर्षीय महाविद्यालयीन मैत्रिणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

कफ परेड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या एका युवतीने मंगळवारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीविरुद्ध कलम ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!