Skip to content

राणे म्हणाले ‘मशाल’ नव्हे तो तर ‘आइस्क्रीम’ ; वायकर म्हणाले, ‘मग तोंडात….!’


अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे ‘कमळ’ आणि ठाकरे गटाचे ‘मशाल’ यांच्यात चुरशीची लढत होत आहे. यादरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हाला आईस्क्रीमचा कोण म्हटले आहे.

मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शुक्रवारी भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी तर ‘शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने, दिवंगत आमदार यांच्या पत्नी ऋतुजा लट्टे यांनी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’ने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही ठाकरे यांच्या समर्थनार्थ उमेदवार उभे केले नाहीत. म्हणजेच आता लढत कमळ आणि मशाल यांच्यात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर तोंडसुख घेतले आहे.

उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ कधीची विझली आहे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. मशाल थंड आहे , त्याच्या आत आग नाही. ती मशाल नसून तो एक आइस्क्रीमचा कोन आहे. नितेश राणेंच्या या विधानाने ठाकरे गटातील नेत्यांना फारच झोंबले आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबान’ हे जुने निवडणूक चिन्ह गोठवले आहे आणि दुसरीकडे ‘मशाल’ या नव्या निवडणूक चिन्हाची आग विधानांनी विझवली जात आहे. या वक्तव्यावर ठाकरे गटाकडूनही प्रत्युत्तर आले.

ठाकरे थंड पडलेले पाहून EC ने निवडणूक चिन्ह आईस्क्रीम दिले – राणे

शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले, ‘मशाल हे उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह असू शकत नाही, त्या व्यक्तीच्या आतली आग संपली आहे. मशाल नसून हा आइस्क्रीमचा कोन आहे. या व्यक्तीच्या आतली आग संपली आहे, असे निवडणूक आयोगाला वाटले असावे, म्हणून त्याला आईस्क्रीम कोन देण्यात आला. आता तो आणि त्याचा मुलगा आदित्य या कोणा सोबत फिरत राहणार.

मग तोंडात घ्या मग समजेल आइस्क्रीम की मशाल

नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह ‘मशाल’ याला ‘आईस्क्रीम कोन’ म्हटल्याने आमदार रवींद्र वायकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे नेते वायकर यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले तोंडात घ्या म्हणजे समजेल कोण आहे की मशाल अशा शबदत राणेंना वायाकरांनी फटकारले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!