Skip to content

Business Ideas For Students | कमी वयातच पैसे कमवायचेय? मग हे ५ व्यवसाय करा,आणि लाखो रुपये मिळवा..


Business Ideas For Students: जेव्हा तुम्ही महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असता त्यावेळी तुम्हाला अनेकदा पैशांची कमतरता भासते. काही वेळेला घरच्या बिकट  परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे वेळेवर पैसे मिळत नाहीत. तसेच कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यांना वर खर्चासाठी पैशांची गरज भासते. अशा वेळी नेमकं करावं काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडत असतो.

परंतु, आता विद्यार्थीदशेत असतानाच तुम्ही व्यवसाय करुन भरघोस पैसे कमवू शकतात. पण नेमके  व्यवसाय करावे कोणते? तुम्हाला कमी वयात पैसे कमवायचे असतील, किंवा वर खर्चासाठी घरुन पैसे मागायचे नसतील तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला कमी वयात करता येतील अशा व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत. हे व्यवसाय तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सुरू करू शकतात व पैसे कमवू शकता.

 भाषांतर करा व पैसे कमवा

तुम्हाला भाषांतर करण्यात रस असेल तर, तुम्ही भाषांतरकार म्हणून काम किंवा व्यवसाय सुरू करू शकतात. यासाठी तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजीचे किंवा इतरही काही स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय भाषांचे उत्तम ज्ञान असायला हवे. तुम्ही विविध प्रकारांतील लेख भाषांतर करुन भरघोस पैसे कमवू  शकता.

ISRO Chandrayaan-3 | नासाची ‘चांद्रयान-3’ चे तंत्रज्ञान विकत घेण्याची तयारी..

 शिकवणी घेऊनही पैसे कमवू शकता

एखादा विषय इतरांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता किंवा समजावून सांगता येत असेल. तर तुम्ही मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकता. यासाठी तुम्हाला शिकवणीच्या फी स्वरूपात चांगला मोबदला देखील मिळेल. जेणेकरून तुम्हाला कोणवरही अवलंबून रहावे लागणार नाही. आणि तुमचा वर खर्चही तुम्ही स्वतःच्या पैशांनी करू शकता.

यूट्यूब चॅनल सुरू करा व पैशांसोबत फेमही मिळवा  

यूट्यूब वर व्हिडिओ अपलोड करून तुम्हीही भरघोस पैसे मिळवू शकता. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही शिक्षणाशी संबंधित व्हिडिओ अपलोड करू शकता. किंवा जर  तुम्ही शिक्षणासाठी घरापासून दूर राहत असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ (vlog) बनवून पैसे कमवू शकता. तुम्ही तुमच्या दैनंदिनाचा व्हिडिओ देखील अपलोड करू शकता. त्या व्हिडिओंद्वारे कमाई करून चांगले पैसे मिळवा.

लेख लिहूनही कमाई करू शकता

जर तुम्हाला लिखानाची आवड असेल व तुम्ही कुठल्याही विषयांवर चांगले लिहू शकत असाल. तर तुम्ही ब्लॉगिंग म्हणजेच लेख लिखाण सुरू करू शकता. त्यासाठी तुम्ही चांगले मानधन देखील घेऊ शकता.  (Business Ideas For Students)

Good News | Hyundai Car कंपनी देत आहे बंपर डिस्काऊंट


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!