Skip to content

chandwad | चांदवडच्या स्वयंभू रेणुका मातेच्या पालखीची परंपरा…


   चांदवड |  सर्वत्र देवीच्या  शारदीय नवरात्रोत्सवाला उत्साहात व जल्लोषात सुरुवात झाली आहे. या नवरात्रोत्सवाच्या काळात देवीच्या सर्वच मंदिरांत भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असलेल्या राजराजेश्ववरी स्वयंभू श्री. रेणुका माता मंदिरात देखील लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.

           पुण्य व आध्यात्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात विविध धार्मिक स्थळे आहेत. त्यापैकीच एक चांदवड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान प्राचीन असलेली श्री. रेणुका माता. रेणुका मातेचे हे मंदिर चांदवड शहरामधून गेलेल्या मुंबई – आग्रा महामार्गाजवळील सह्याद्रीच्या डोंगररांगेत एका टेकडीच्या गुहेत वसलेले आहे. देवीच्या साडे तीन खंडपीठापैकी अर्धपीठ म्हणून या देवस्थानची प्रचिती आहे. ह्या देवस्थानाला आध्यात्मिक तसेच ऐतिहासिक ही महत्त्व आहे. याठिकाणी चंद्रेश्वर महादेव, इच्छापूर्ती  गणेश मंदिर अशी इतरही सुप्रसिद्ध ठिकाणे आहेत.

Business Ideas For Students | कमी वयातच पैसे कमवायचेय? मग हे ५ व्यवसाय करा,आणि लाखो रुपये मिळवा..

अशी आहे अख्यायिका?

श्री.जमदग्नी ऋषींच्या आज्ञेप्रमाणे पुत्र परशुराम याने स्वतःच्या मातेचे शीर धडापासून वेगळे करून पितृ आज्ञेचे पालन केले.  त्यामुळे रेणुका मातेच्या धडाचा भाग हा माहूर (ता. किनवट,  जि. नांदेड) येथे असून शीर हे चांदवड येथे आहे. त्यामुळे या देवस्थानाला अर्धपीठाचा मान दिला जातो. तसेच येथील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान, आणि आराध्यदैवत म्हणून प्रसिध्द असलेली जगतजननी, श्रीक्षेत्र चांदवड निवासीनी राजराजेश्वरी, स्वयंभू श्री रेणुकामाता म्हणून ओळखले जाते.

अशी आहे ऐतिहासिक परंपरा…

हे मंदिर ब्रिटीशांच्या ताब्यात असताना या पुरातन कालीन मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक  श्री.अहिल्याबाई होळकर यांनी सन १७३५  ते १७९५ या कालावधीत केला आहे. या मंदिरात असणाऱ्या दीपमाळ, पायऱ्या, मुख्य दरवाजा, सभा मंडप, तीर्थ तलाव, आदीचे बांधकामही या काळात केले गेले आहे.  श्री.अहिल्याबाई होळकर त्यावेळी भुयारी मार्गाने पालखीतून  रेणुका मातेचे अलंकार व पूजा साहित्य घेऊन जाऊन देवीची पूजा करीत असे.  ही प्रथा त्यांच्यानंतर होळकर घराण्याकडून पुढे सुरू ठेवण्यात आली. सध्या होळकर ट्रस्ट रंगमहालाच्या माध्यमातून दर पौर्णिमेला , चैत्र पौर्णिमेला आणि नवरात्रात दहा दिवस पालखीची मिरवणूक काढण्यात येते. नाशिक जिल्हयातील प्राचीन व आध्यात्मिक स्थळांपैकी एक सुप्रसिध्द व जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांची या ठिकाणी दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. दुरदुरून भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सव व चैत्र पौर्णिमेला याठिकाणी जत्रा भरते त्यामुळे याकाळात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते.  (chandwad)

kolhapur | ‘गोकुळ’ विरोधात शेतकरी आक्रमक; कार्यालय व चिलिंग सेंटरची मोडतोड 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!