Violence : बापरे, मणिपूर मध्ये जमावाने पोलिसांचा शस्त्रसाठा पळवला


violence : तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार हिंसक रूप घेत आहे. मणिपुर मध्ये असलेल्या विष्णुपुर या ठिकाणी हल्ला करत जमावाने पोलिसांचा शस्त्रसाठा पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.(violance)

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मणिपूर पेटला आहे. या ठिकाणचा हिंसाचार थांबण्याचं नाव घेताना दिसून येत नाहीये यामध्ये काही समाजकंटकांनी विष्णुपुरी येथे पोलिसांचा शस्त्रसाठा पळवून नेला आहे. यामुळे जवान आणि जमावामध्ये प्रचंड झटपट झाल्याचं बघायला मिळालं त्या हाणामारी मध्ये 12 पेक्षा अधिक जवान जखमी झाले आहेत.(violance)

या ठिकाणी हिंसाचार सुरू झाल्यापासून आजतागायत समाजकंटकांकडून लष्करी जवानांना निशाणा केला जात असल्याचं अनेकदा समोर आल आहे. मात्र आता मोठ्या संख्येने आलेल्या या जमावाने थेट जवानांवर हल्ला चढवत त्यांच्याकडील शस्त्रसाठा पळून नेण्यावर लक्ष केंद्रित केलं असून यामुळे राज्यात आणखीनच तणाव निर्माण झाला आहे.(violance)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तीन मे पासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे आणि कुकी समुदायांमध्ये हा हिंसाचार सुरू असून यामध्ये आत्तापर्यंत दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक या मध्ये जखमी झाले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडून या ठिकाणचा हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असताना हे प्रयत्न देखील अपयशी ठरत आहेत.(violance)

एकीकडे हा हिंसाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे आता या जमावाकडून पोलिसांची शस्त्रगारे लुटण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. यामुळे या वाढत्या घटनांमुळे या ठिकाणचा तणाव दिवसागणिक वाढत आहे.(violance)

https://thepointnow.in/bmc-news/

केंद्रीय सैन्याने विष्णुपूर जिल्ह्यातील क्वाकटा भागाच्या दोन किलोमीटर पुढे बफर झोन तयार केला आहे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की काही लोक बफर झोन ओलांडून मेईतेई भागात आले आणि त्यांनी गोळीबार केला. दरम्यान, एका कमांडोच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी कमांडोंची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून त्यांना विष्णुपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(violance)

 काही दिवसांपासून मणिपूर मधील परिस्थिती पुन्हा एकदा हाताबाहेर जात असल्याचे स्पष्ट होतंय या ठिकाणी रोजच जाळपोळ आणि हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे या ठिकाणी शासनाकडून इंटरनेट सेवा बंद करण्याबरोबरच कर्फ्यू देखील लागू करण्यात आलाय तसेच मणिपूर बाबत अनेक अपवाद देखील समोर येत असल्याने त्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असा आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.(violence)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!