Vidhansabha Election | दोन राज्यांमध्ये विधानसभेचे बिगुल वाजले; महाराष्ट्रात निवडणूक कधी..?

0
49
Vidhansabha Election
Vidhansabha Election

मुंबई :  आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यात दोन राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यानुसार हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून, महराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हरियाणा विधनासभेचा कार्यकाळ हा 3 नोव्हेंबर रोजी संपणार असून, 1 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यातच येथील विधानसभा निवडणूक होणार आहे. तर, जम्मू काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार असून, पहिला टप्पा – 18 सप्टेंबर, दूसरा टप्पा – 25 सप्टेंबर, तिसरा टप्पा – 1 ऑक्टोबर रोजी तिन्ही टप्प्यांचे मतदान पार पडणार आहे. या दोन्ही राज्यातील निवडणुकांचा निकाल हा 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल.

Vidhansabha Election | सस्पेन्स संपणार; विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार..?

Vidhansabha Election |  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी..?

दरम्यान, आजच्या या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केलेली नसून, केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांना याबाबत प्रश्न विचारला असता, “महाराष्ट्रात सध्या पाऊस पडला असून, शिवाय गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री व दिवाळी असल्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आत्ताच जाहीर केलेल्या नाही. परंतु कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या जातील, असे राजीव कुमार म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत ही 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर हरियाणा विधानसभेची मुदत ही 3 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तसेच जम्मू आणि काश्मिरच्या निवडणुकीसंबंधी 30 सप्टेंबरपूर्वी निवडणूक घोषित करा, त्याचे नियोजन करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले होते.

आज हरियाणा आणि जम्मू काश्मिर या राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या निवडणुकांचे नियोजन करण्यासाठी आयोगाच्या पथकांनी यापूर्वी जम्मू काश्मिर आणि हरियाणा राज्याचे दौरे केले होते. मात्र, महाराष्ट्रात असा अद्याप कोणताही दौरा झालेला नाही. त्यामुळे इतक्यात या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमीच.

VidhanSabha Election | विधानसभेचे फटाके दिवाळीनंतर..?; उशीरा निवडणुकीचा फायदा कोणाला..?

370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक 

370 कलम हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये कोणतीही निवडणूक झालेली नव्हती. दरम्यान आता तब्बल 10 वर्षांनंतर जम्मू काश्मिरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. जम्मू-काश्मिरमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्याची मागणी तेथील राजकीय पक्षांनी केली होती. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. त्यानंतर 30 सप्टेंबरपूर्वी निवडणुका घेण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता तेथे तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here