Nashik News | नाशकात सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान राडा; शहरात तणावाची परिस्थिती

0
79
Nashik News
Nashik News

Nashik News | आज राज्यभरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांग्लादेशमधील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात मोर्चा काढत बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज जिल्ह्यातील सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, दुपारपासून हिंदू संघटनांच्या वतीने हा शहरातील विविध भागात हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, भद्रकाली परिसरात हा मोर्चा आला असता, मोर्चाला गालबोट लागले. भद्रकाली परिसरात आमच्यावर दगडफेक झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. येथील मोर्चेकरी आणि दुकानदार यांच्यातही वाद झाल्याने येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

Nashik News | नाशिक हादरलं..! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्धाला जिवंत जाळले

Nashik News |  नेमकं काय घडलं..?

या भागातील काही दुकानं उघडी असल्याने दुकान बंद करण्यावरून दोन गटात वाद झाला आणि येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली हप्ती. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असता आमदार देवयाणी फरांदे यांनी मध्यस्थी केली आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केले व मोर्चा पुढे रवाना झाला. बांग्लादेशमध्ये हिंसाचार उसळला असून, तिथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर अत्याचार होत असल्याचे वृत्त समोर आले होते.

या पार्श्वभूमीवर राज्यभरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. या बंद शहरातून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मोर्चा दरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तर, यावेळी आमदार देवयाणी फरांदे यांनी आंदोलकांनी पोलिसांना सहकार्य करावं. कोणीही कायदा हातात घेऊ नये. सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

Nashik News | नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून महिलेने पोलिस स्टेशनसमोरच कापली हाताची नस

जळगावमध्येही मोर्चादरम्यान दगडफेक

जळगावमध्येही सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चालाही गालबोट लागले आहे. मोर्चामधील काही तरुणांनी बाईक शोरुमवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पुन्हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. दगडफेक झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here