Vidhansabha Election | सस्पेन्स संपणार; विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार..?

0
57
Vidhansabha Election
Vidhansabha Election

Vidhansabha Election |  महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून, सर्वसामान्यांपासून नेतेमंडळींनाही निवडणुका कधी होणार याची उत्सुकता लागून आहे. दरम्यान, अखेर आज हा सस्पेन्स संपणार असून, महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जाऊ शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. (Vidhansabha Election)

मागील काही दिवसांपासून निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. मतदान दिवाळीनंतर होईल की दिवाळीआधी याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. यातच आता निवडणुक आयोगाने पत्रकार परिषदेची घोषणा केली असून, यामुळे आज निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पण राजकीय तज्ज्ञांच्या मते आताच राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर होण्याची शक्यता तशी कमीच आहे.

VidhanSabha Election | विधानसभेचे फटाके दिवाळीनंतर..?; उशीरा निवडणुकीचा फायदा कोणाला..?

Vidhansabha Election |  महाराष्ट्रात वर्षाअखेरीसच निवडणुका..?

दरम्यान, आजच्या या निवडणुक आयोगाच्या पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. कारण काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या टीमने या दोन्ही राज्यांचा दौरा केला होता. त्यानंतर 30 सप्टेंबरच्या आधी या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील असंही सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभेचा कार्यकाळ हा नोव्हेंबरमध्ये संपणार असून, झारखंडमध्येले विधानसभेचा कार्यकाळ हा जानेवारी महिन्यात संपणार आहे.(Vidhansabha Election)

त्यामुळे या राज्यांमध्ये वर्षाअखेरीसच निवडणुका होतील असे बोलले जात आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ हा 26 नोव्हेंबर 2024ला संपणार आहे. त्यामुळे एवढ्या लवकर निवडणुकांची घोषणा होण्याची आणि तीन महिन्यापूर्वीच आचार संहिता लागू होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अर्थात दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून काय घोषणा करते हे पहावे लागणार आहे.

Vidhansabha Election | शरद पवारांचा डाव..!; बारामतीसह ‘या’ मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी मैदानात..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here