Vidhan Parishad election Result | महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय; कॉंग्रेसची मतं फुटली..?

0
50
Vidhan Parishad election Result
Vidhan Parishad election Result

Vidhan Parishad election Result |  बहूप्रतीक्षित महाराष्ट्र विधान परिषदेच्या मतांची मतमोजणी सुरू आहे. या विजयासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. हा कोटा अद्याप भाजपच्या चार उमेदवारांनी पार केला असून, भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. पंकजा मुंडे आणि परिणय फुके यांनी अतिरिक्त 3 मतं मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. तर, अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे दोन्ही उमेदवार विजयी झाले असून, राजेश विटेकर यांना 23 तर, शिवाजीराव गर्जे यांना 24 मतं मिळाली आहेत. (Vidhan Parishad election Result)

Vidhan Parishad election | एक आमदार रुग्णालयातून तर, एक तुरुंगातून मतदानासाठी दाखल

Vidhan Parishad election Result | कॉंग्रेसची मतं फुटली..?

महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांना केवळ एक मताची आवश्यकता आहे. कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव या 25 मतांनी विजयी झाल्या आहेत. शेकापचे जयंत पाटील हे 12 मतांवर असून, त्यांनी मतमोजणी केंद्र सोडले आहे. शरद पवार गटाचा पाठिंबा असूनही जयंत पाटील यांची मतांची संख्या घतली आहे. शिंदे गटाचे कृपाल तुमाने हे 24 मतांनी विजयी झाले असून, भावना गवळी यांचाही विजय झाला आहे.

भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले असून, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्याही सर्व उमेदवारांचा विजय झाला आहे. तर, कॉंग्रेसची मतं फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसची संत मतं फुटल्याची माहिती समोर आली असून, सदाभाऊ खोत यांचाही विजय झाला आहे. तर, सर्वात कमी मतं ही शेकापचे जयंत पाटील यांना मिळाल्याने त्यांचा पराभव होणार असल्याचे सध्या दिसत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here