राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वसतीर्थ टाकेद | सिन्नर विधानसभा मतदारसंघातील ४० पेक्षा जास्त रस्त्यांचे भाग्य उजळणार असून त्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी विशेष प्रयत्न करून या रस्त्यांसाठी ७० कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला आहे. गेल्या साडेचार वर्षांत दरवर्षी विधिमंडळाच्या होणाऱ्या अधिवेशनातून आमदार माणिकराव कोकाटे यांनी विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला आहे. विशेष करून रस्त्यांची कामे यातून झाली असून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मतदारसंघातील ४० हून अधिक रस्त्यांना ७० कोटींहून अधिक निधी मिळविण्यात आमदार कोकाटे यांना यश मिळाले आहे.
गेल्या साडेचार वर्षांत आदिवासी भागातील दळणवळण सुलभ करण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणलेला असतांना आताही सुमारे ५५ कोटींहून अधिक निधीतून आदिवासी भागातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होणार आहे. सिन्नर तालुक्यातील व टाकेद गटातील आदिवासी भागात मुख्यत्वे हे रस्ते होणार आहेत. शिवाय तालुक्यातील बिगर आदिवासी भागातील बऱ्याच रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी आमदार माणिकराव कोकाटे यांचे आभार मानत विकास कामांचा धडाका सुरू ठेवल्यामुळे त्यांचे अभिनंदनही केले आहे.
Sinnar | आ. कोकाटे यांच्या प्रयत्नातून तातळेवाडी ते टाकेद खुर्द रस्त्याच्या कामाला सुरुवात
Sinnar | या रस्त्यांचे भाग्य उजळणार…
शुक्लतीर्थ खेड मांजरगाव रस्ता १ कोटी ५० लाख, खेड ते भैरवनाथ मंदिर रस्ता मध्ये संरक्षक भिंतीचे काम करणे १ कोटी, खेड ते इंदोरे रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लाख, आगासखिंड- औंढेवाडी रस्ता ते इतर जिल्हा मार्ग १७२ पर्यंतची सुधारणा करणे १ कोटी ५० लाख, घोरवड ते लहवित रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी, घोटी खु. ते साकुर रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, कवडदरा ते घोटी खु. रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, कवडदरा ते भरविर खु. रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी, भंडारदरावाडी ते भरविर बु रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी, इंदोरे ते जाधव वस्ती रस्ता सुधारणा करणे ३ कोटी, गिर्हेवाडी ते बेलू तालुका हद्दीपर्यंत रस्ता सुधारणा करणे ८० लाख, इंदोरे ते देवाची वाडी रस्त्याची सुधारणा करणे ७ कोटी,
आधारवड ते वासाळी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, सोनांबे डगळे वस्ती ते चंद्रपूर खापराळे रस्ता सुधारणा करणे ३ कोटी, चंद्रपूर खापराळे सोनांबे आडवाडी रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी, साकुर ते शेनीत रस्ता सुधारणा करणे २ कोटी ५० लाख, निनावी मेघाळवाडी गिरेवाडी फाटा ते आगासखिंड रस्ता सुधारणा करणे २ कोटी, निनावी महादेववाडी ते गिर्हेवाडी रस्ता सुधारणा १ कोटी ५० लाख, बारशिंगवे ते परदेशवाडी रस्ता सुधारणा करणे २ कोटी, टाकेद ते तातळवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी ५० लाख, भंडारदरावाडी ते फोडसेवाडी झरी नाला रस्ता २ कोटी, भरवीर खु. ते धामणगाव चौरेवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी,
आगासखिंड ते औंढेवाडी ते इतर जिल्हा मार्ग रस्ता १ कोटी ५० लाख, घोरवड ते लहवीत रस्ता १ कोटी, घोरवड म्हसळवाडी ते प्रमुख जिल्हा मार्ग १ कोटी, बोरखिंड प्रजिमा १ कोटी, धोंडबार ते प्रमुख जिल्हा मार्ग १ कोटी, शिवडा ते भैरवनाथ मंदिर ग्रामीण मार्ग १ कोटी, शिवडा ते ठाकूरवाडी धोंडबार रस्ता १ कोटी, पांढुर्ली ते औंधवाडी रस्ता १ कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग २६ ते आगासखिंड घोरवड रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी, घोरवड ते धोंडेवाडी रस्त्याची सुधारणा करणे १ कोटी,
घोरवड ते जामगाव वाडी रस्ता १ कोटी, औंढवाडी ते औंढवाडी फाटा रस्ता १ कोटी, धोंडबार तासदरा ते ठाकूरवाडी रस्ता सुधारणा करणे १ कोटी, बोरखिंड ते डावखरे वस्ती रस्ता सुधारणा करणे १ कोटी, बारागाव पिंप्री ते पाटपिंप्री -तळवाडे-रामनगर रस्त्याची सुधारणा करणे २ कोटी, वडांगळी ते निमगाव-सिन्नर रस्त्याची सुधारणा करणे ३ कोटी, सिन्नर नायगाव-जायगव रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे ५ कोटी, खडांगळी येथे राज्य मार्ग ३५ ते मेंढी चौफुली पर्यंत व सोमठाणे सबस्टेशन ते सांगवी रुपये ५ कोटी रस्त्यांचे पक्के जाळे निर्माण होतेय.
“सिन्नर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लहान-मोठे रस्ते आहेत. या सर्वच रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे झाली आहेत. आताही नवीन कामे मंजूर झाली आहेत. यापूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यांचीही कामे आचारसंहिता असल्यामुळे सुरू होऊ शकली नाही. ही कामेही लवकरच सुरू होतील व नव्याने मंजूर झालेल्या रस्त्यांसाठी तात्काळ निविदा प्रक्रिया राबवून ती पूर्ण करून या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या आहेत.”
– (आमदार माणिकराव कोकाटे, सिन्नर विधानसभा)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम