पुणे: लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा असल्याने मनसेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकून वंचितच्या उमेदवार झालेल्या वसंत मोरेंनी आता वंचित सोडून ठाकरे गटात जाण्याची तयारी केली आहे. कधीकाळी पुण्यातील मनसेचे निष्ठावंत नेते असलेल्या वसंत मोरेंनी (Vasant More) आता राज ठाकरेंची साथ सोडून उद्धव ठाकरेंचा हात धरला आहे. त्यांनी गुरुवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर ते आता ९ जुलै रोजी ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, वसंत मोरेंच्या या निर्णयानंतर पुण्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे सोडली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत टयांचाय दारुण पराभव झाला आणि मोर यांचे डिपॉझिटही जप्त झाले. त्यामुळे वसंत मोरे (Vasant More) यांनी लगेचच आता ठाकरे गटाकडे मोर्चा वळवला असून, ते ९ जुलैला पक्षप्रवेश करणार आहेत.
Vasant More | तात्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली;.., अन् माफी मागत ढसाढसा रडले
Vasant More | मोरेंच्या कार्यालयाबाहेर वंचितचे आंदोलन
दरम्यान, यामुले वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, वसंत मोरेंच्या कात्रज येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेरच हे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. वसंत मोरे (Vasant More) यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष आणि ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा केलेला विश्वासघात याच्या निषेधार्थ वसंत मोरे यांचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी, युवा, महिला आघाडी, माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबतचा मेसेज वंचितच्या कार्यकर्त्यांना पाठवण्यात आला आहे.
Pune News | दर्गा की पुण्येश्वर महादेव मंदिर..?; दर्ग्याच्या अतिक्रमणावरून तणाव
या मतदार संघांतून विधानसभा लढवणार
तर, लोकसभेत पराभव आणि थेट डिपॉझिट जप्त झाल्यानंतर आता वसंत मोरे विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्यासमोर दोन पर्याय असून, मी आगामी विधानसभा निवडणूक ही खडकवासला व हडपसर या दोन्ही मतदार संघांतून लढू शकतो. पुणे शहरात माझे मतदान नव्हते, आमी तो माझा भागही नव्हता तरीही मला तिथे चांगले मतदान झाले आहे. तसेच माझ्यावर पहिला गुन्हा हा मी शिवसेनेत असताना दाखल झाला होता. मी बदलणारा नाही, जनतेसाठी, जनतेच्या हितासाठी काम करणार असून, शहरात व बाहेरच्या भागात शिवसेनेची ताकद आहे. १० नगरसेवक आहेत, असेही यावेळी वसंत मोरे यांनी सांगितले. (Vasant More)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम