Deola | प्रशासकीय इमारतीच्या आवारात केदा आहेर यांच्याकडून बाके उपलब्ध करून देण्यात आली

0
17
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात अभ्यागतांसाठी भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी बाके उपलब्ध करून दिली. आहेर यांच्या ह्या सामाजिक बांधिलकीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. देवळा-खर्डे रस्त्यावर नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आली असून, याठिकाणी तहसील, तालूका कृषी, सहाय्यक निबंधक, दुय्यम निबंधक आदी कार्यालये कार्यरत आहेत. येथे तालुका जिल्हाभरातून तसेच खेड्यापाड्यातून विविध कामांसाठी नागरिक येत असतात. त्यांना आवारात बसण्यासाठी जागा नसल्याने कुठेतरी ताटकळत राहावे लागत होते.

Deola | ‘सहकार टिकला तर उद्योग टिकेल’ – केदा आहेर

नागरीकांची ही होणारी गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांनी बाके उपलब्ध करून दिल्यामुळे अभ्यागतांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आहेर यांच्या ह्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करण्यात येत आहे. इमारतीच्या आवारात लावण्यात आलेल्या झाडांमुळे उन्हात याठिकाणी सावलीचा आसरा नागरिक घेतात. येथे नुकतेच फेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. त्यावर आता आहेर यांच्या माध्यमातून बसविण्यात आलेल्या बांकामुळे इमारतीच्या वैभवात देखील भर पडली आहे.

Deola | देवळा तालुक्याला प्रथमच एवढे मोठे पद; केदा आहेर यांचे जल्लोषात स्वागत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here