Vasant Chavan | महाराष्ट्रात काँग्रेसवर शोककळा; नांदेडच्या खासदारांचे निधन

0
55

नांदेड : नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण मागील काही दिवसांपासून आजारी होते. हैदराबादच्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार केले जात होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावली व 3 वाजताच्या दरम्यान वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने आज संपूर्ण नांदेडमध्ये शोकाकुल वातावरण आहे.

Eknath Khadse | मोदींच्या सभेवर ‘नाथा भाऊंचा’ बहिष्कार; एकनाथ खडसे नेमके कुणीकडे..?

काही दिवसांपूर्वी वसंत चव्हाण यांची प्रतिकृती अचानक खालावली त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याकारणाने त्यांना त्वरितच हैद्राबादी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना लो बीपीचा देखील त्रास होता. उपचारादरम्यान काल मध्यरात्री अचानकपणे त्यांची प्रकृती खालावली आणि वसंत चव्हाणांनी अखेरचा श्वास घेतला.

लोकसभा निवडणूकीत मिळाले होते यश

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये वसंत चव्हाण यांनी तात्कालीन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. मागील दोन दशकांपासून ते नांदेड जिल्ह्यातील राजकारणात कार्यरत होते. वसंत चव्हाण यांच्या प्रतिनिधित्वात काँग्रेसने 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली व जिंकली. दरम्यान, अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला पाठ दाखवत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 2024 च्या निवडणुकांत नांदेडमध्ये वसंत चव्हाणकडून मिळालेला हा विजय फार महत्त्वपूर्ण होता.

Sanjay Shirsat | “ते पावसात भिजतायत, आम्हालाही शॉवर लाऊन भाषणं करावी लागतील; शिंदे गटाचा सणसणीत टोला

वसंत चव्हाण यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच खासदार होण्यापूर्वी ते अपक्ष आमदार म्हणूनही निवडून आले होते. नायगाव विधानसभा संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. 2014 मध्ये विधानसभा लोकलेखा समितीवर त्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यासोबतच ते ॲग्री आणिशश जनता हायस्कूल यांचे अध्यक्ष देखील होते.

वसंत चव्हाणांची राजकीय कारकीर्द

* 15 ऑगस्ट 1954 सालचा जन्म

* 24 साव्या वर्षी (1987) नायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच

* 1990 साली जिल्हा परिषद अध्यक्ष

* 2002 मध्ये राष्ट्रवादीकडून विधान परिषद सदस्य

* 2009 मध्ये अपक्ष विधानसभा सदस्य

* 2014 मध्ये काँग्रेसकडून विधानसभा सदस्य

* 2024 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा सदस्य

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here