Eknath Khadse | मोदींच्या सभेवर ‘नाथा भाऊंचा’ बहिष्कार; एकनाथ खडसे नेमके कुणीकडे..?

0
47
Eknath Khadse
Eknath Khadse

Eknath Khadse |  आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव येथे प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाच निमंत्रण न दिल्याने यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. पंतप्रधानांची आजची सभा ही शासकीय कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाचे निमंत्रण ही सर्व आमदारांना देणे बंधनकारक होते. मात्र, तरीही आपल्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नसून जर वेळेत निमंत्रण दिले असते तर कार्यक्रमासाठी जाणार होतो. मात्र, आता निमंत्रण न मिळाल्याने मी कार्यक्रमाला जाणार नसल्याची ठोस भूमिका एकनाथ खडसे यांनी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता प्राईम इंडस्ट्रीयल पार्क येथे लखपती दीदी संमेलन हे पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता छत्रपती संभजीनगर विमानतळावर मोदींचे विमान दाखल होईल. त्यानंतर ते जळगावात सकाळी 11.15 ते  12 दरम्यान पोहोचतील आणि येथे ते बचत गटाच्या महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते इंडस्ट्रीयल पार्क येथील नियोजित कार्यक्रमस्थळी दाखल होतील.(Eknath Khadse)

Eknath Khadse | नाथाभाऊंची राजकारणातून निवृत्ती..?; केली मोठी घोषणा

जळगावात शोकाकुल वातावरण

जळगावमधील (jalgaon) 30 जणांचा नेपाळ येथे बस दुर्घटनेत मृत्यू झाला. यापैकी अनेकांचे वरणगाव येथे आणण्यात आले असून, पंतप्रधान मोदींची आजची सभा असल्याने या मृतदेहांवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे संऔरं जळगावात शोकाकुल वातावरण आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या आपघातातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. यात आपल्या एका बालपणीच्या मित्राचाही मृत्यू झाल्याचे सांगताना खडसे भावुक झाले.

Eknath Khadse | नाथा भाऊंचं नेमकं चाललंय काय..?

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे नेमके कुणीकडे..? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कारण आपण शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्वतः एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. त्यानंतर खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. मात्र, अजूनही त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश न झाल्याने आणि आता मोदींच्या कार्यक्रमाचेही आमंत्रण नसल्याने नाथा भाऊंचं नेमकं चाललंय काय..? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.  (Eknath Khadse)

Eknath Khadse | सुनबाईंसाठी एकनाथ खडसे प्रचाराच्या मैदानात

कट्टर वैरी महाजनांनीही खडसेंना डिवचले

यावरून त्यांचे कट्टर राजकीय वैरी भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनीही या मुद्द्यावरुन खडसे यांना अनेकदा डिवचले. अलीकडेच त्यांनी, “एकनाथ खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे. मात्र एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची कोणालाच माहीती नाही’, अशी मिश्किल टिप्पणी केली होती.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here