Sanjay Shirsat | “ते पावसात भिजतायत, आम्हालाही शॉवर लाऊन भाषणं करावी लागतील; शिंदे गटाचा सणसणीत टोला

0
36

छत्रपती संभाजीनगर : बदलापूर येथे झालेल्या अत्याचारा प्रकरणी महाविकास आघाडीकडून आज 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने मविआकडून घोषित केलेल्या महाराष्ट्र बंदला बेकायदेशीर ठरवल्यानंतर काल संध्याकाळी मुकआंदोलनाची घोषणा केली गेली. आज सकाळी दहा वाजल्यापासून महाविकास आघाडीच्या पक्षांकडून राज्यात ठिकठिकाणी हे मुकआंदोलन केले गेले. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तोंडाला काळा मास्क लावून आंदोलनात सहभाग घेतला. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस असतानाही हे आंदोलन थांबले नाही. याच मुद्द्याला हेरत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठांनी शरद पवारांवर चांगलाच निशाणा साधला.

Muk Morcha | ‘…तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू’; पहिल्यांदाच हे दृश्य पहायला मिळणार, मविआचे नेते रस्त्यावर उतरणार

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट

बदलापूर घटना व राज्यामध्ये होत असलेल्या महिला अत्याचारांच्या निषेधार्थ मविआकडून केले गेलेले मुकआंदोलन ‘आपल्या पक्षाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी केले गेले.’ असे म्हणत संजय शिरसाठांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यावरती टीका केली. “सरकारच्या हातात असलेली सर्व प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. तरीही हे आंदोलन करून लोकांना वेगळं काहीतरी करून दाखवण्याची खाज असल्यामुळे हे आंदोलन केले गेले.

Ajit Pawar | ‘अशा आरोपींचं सामानच काढून टाकलं पाहिजे’; बदलापूर प्रकरणावरुन दादांना राग अनावर

सत्ता कोणाची आहे या गोष्टीचा विचार न करता, जर सरकारला सूचना दिल्या गेल्या असत्या तर तो समाजासाठी चांगला संदेश ठरला असता. सत्ताधारी पक्षाला प्रतिकार करण्यासाठी हे जे काही आंदोलन केले गेले त्याची गरज नव्हती. फाशी देण्याची जबाबदारी सरकारची हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी हे आंदोलन केले जात असेल तर ते त्या पक्षातील नेत्यांनी पहावे. अशा प्रकारचे आंदोलन करून त्यांनी जनतेला नाटकाचा भाग दाखवला.” मा. शरद पवार हल्ली पावसात जास्तच भिजत आहेत. लोकांनाही असं वाटतं की पावसात भिजल्याने निवडून येता येतं. त्यामुळे आम्हाला देखील आता शॉवर लावून भाषणं करावी लागतील.” असं म्हणत शरद पवारांवर टीकास्त्र सोडले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here