Vasai Girl Murder | भर रस्त्यात प्रेयसीला संपवलं; नागरिक शुटिंग काढण्यात अन् गंमत बघण्यात व्यस्त

0
72
Vasai Girl Murder
Vasai Girl Murder

वसई :  राज्यात गेल्या काही महिन्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, अनेक क्रूर घटना समोर येत आहेत. दरम्यान, यातच आता वसईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यानुसार, वसई परिसरात एका तरुणीची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे. भल्यामोठ्या लोखंडी पान्याने एकामागोमाग एक घाव घालत आरोपीने तरुणीला संपवले.

विशेष म्हणजे भर रस्त्यात हा हत्येचा थरार सुरू असताना आजुबाजूचे नागरिक हे सगळं बघत होते. तर, अनेकांनी या घटनेचे शुटिंग केले. मात्र, कोणीही त्या तरुणीच्या मदतीला धावले नाही. ही संतापजनक घटना वसईच्या (Vasai) गौराईपाडा येथे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणातील आरोपीचे नाव रोहित रामनिवास यादव (वय २९ वर्ष) तर, मयत तरुणीचे नाव आरती रामदुलार यादव (वय २२) असे होते. (Vasai Girl Murder)

Parbhani Murder | भररस्त्यात पत्नीवर कोयत्याने वार; प्रेमाचा थरारक शेवट

Vasai Girl Murder | नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, या प्रकरणी आरोपी रोहित याने लोखंडी पाण्याने आरतीच्या शरीरावर १५ घाव घातले. तिचा मृत्यू झाल्यानंतरही तो  तिच्या मृतदेहावर घाव घालतच होता. यात तिचा जागीच मृत्यू झाला. हे होत असताना आजुबाजूला अनेक नागरिक बघत होते. मात्र, कोणीही तिच्या मदतीला आले नाही. तिच्यावर हल्ला करण्यापूर्वी आरोपी, “ऐसा क्यों किया मेरे साथ?”, असे जोरजोरात ओरडत होता. त्यानंतर त्याने आरतीवर लोखंडी पान्याने जीवघेणा हल्ला केला.(Vasai Girl Murder)

ही तरुणी वसईच्या पूर्वेकडील भागातील एका खासगी कंपनीत कामाला होती. मयत आरती व आरोपी रोहित हे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये बिनसले असल्याने आरती त्याला टाळत होती. याचाच राग मनात धरून त्याने तिचा काटा काढला. यापूर्वी ८ जूनलाही आरोपीने तिला मारहाण केली होती. त्याने तिचा मोबाईलही फोडला. यानंतर आरतीने आचोळा पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार केली होती.(Vasai Girl Murder)

Mumbai Murder | …अन् पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली बिल्डर पतीची हत्या

यावेळी हल्ला होत असताना काही जणांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता. तो त्यांच्यावर धावून गेला. आरतीवर हल्ला केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तेव्हाही तिला रुग्णालयात नेण्यात आले नाही. तो शेवटपर्यंत शेजारील एका दुकानाच्या पायरीवर बसून तिच्या मृतदेहाकडे पाहत होता.

कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

यापूर्वी आरतीने आचोळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी आरोपीला केवळ समज देऊन सोडून दिले. जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती. तर माझी बहीण नक्कीच वाचली असती, असा गंभीर आरोप मृत आरतीच्या बहिणीने पोलिसांवर केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here