Igatpuri | आ. कोकाटे यांनी शब्द पाळला; डी.एल.सी धर्तीवर टाकेद ते धामणगाव रस्त्याचे काम पूर्ण

0
16
Igatpuri
Igatpuri

राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | सिन्नर-इगतपुरी विधानसभा मतदार संघातील इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद ते धामणगाव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. खड्डेमय रस्त्यांची दुर्दशा कधी मिटणार..? असा प्रश्न टाकेद परिसरातील वाहनधारकांना पडला होता. अखेर या प्रश्नांची दखल आमदार माणिकराव कोकाटे यांनी घेतली व या रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावला.

गेल्या एक दोन वर्षांपासून या रस्त्याचे कामकाज चालू होते. अखेर या रस्त्याचे कामकाज डी एल सी प्रणालीवर पूर्ण झाले. यासोबतच गेल्या अनेक महिन्यांपूर्वी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे टाकेद गावच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी टाकेद तीर्थ ते टाकेद गाव व परिसरात काँक्रीट रस्ता करण्याची मागणी केली होती व अखेर या रस्त्यासंदर्भात आमदार माणिकराव कोकाटे यांनी जानेवारी महिन्यात टाकेद येथील अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने सभामंडप लोकार्पण कार्यक्रमात तसा टाकेद येथील ग्रामस्थांना शब्दही दिला होता.

Igatpuri | आ. कोकाटेंच्या प्रयत्नातून स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच नांदूरकीपाड्यात पोहोचला रस्ता

आ. कोकाटे यांनी दिला होता शब्द 

टाकेद तीर्थ ते टाकेद गाव व चौक परिसरातील तसेच टाकेद स्मशानभूमी, कडवा नदी, पुलापर्यंत काँक्रीटरस्ता पूर्ण करण्यात येईल. यासोबतच म्हैसवळण घाट मार्गे, टाकेद ते वासाळी मार्गे आंबेवाडी, भावली मार्गे इगतपुरी हाही रस्ता पूर्ण मंजूर आहे असे आश्वासन आमदार कोकाटे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले होते. अखेर आमदार माणिकराव कोकाटे यांनी टाकेद ग्रामस्थांना दिलेला शब्द लवकरच पूर्ण होत आहे.

दरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सध्या पहिल्या टप्प्यात टाकेद तीर्थ ते टाकेद-धामणगाव फाटापर्यंत डी एल सी प्रणावलीवर उत्तम दर्जाचे काँक्रीट रस्ता काम पूर्ण झाले असून उर्वरित टाकेद-धामणगाव फाटा ते टाकेद गाव व गावातील मुख्य मारुती मंदिर चौक व गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी जवळपास पाच कोटी रुपयांच्या कामाचे जुलै महिन्यात टेंडर निघणार असून लवकरच या रस्त्याचे कामकाज पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक संजय डावरे यांनी दिली. दरम्यान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नामुळे टाकेदतीर्थ ते टाकेद गाव परिसरातील खड्डेमय रस्ता प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Igatpuri | लायन्स क्लब यांचे संयुक्त विद्यमाने इगतपुरीमध्ये जिल्हा परिषद शाळेचे ‘रोल मॉडेल’

“टाकेदतीर्थ ते टाकेद गाव, मुख्य चौक व गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे मागणी केली होती. अखेर ही मागणी लवकरच पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्यातील सर्वतीर्थ रस्त्याचे काम पूर्ण झाले असल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.”
– राम शिंदे (सामाजिक कार्यकर्ते, टाकेद)

“टाकेदतीर्थ ते टाकेद गाव व अंतर्गत परिसरात डी एल सी धर्तीवर पूर्णपणे उत्तम दर्जाचा काँक्रीट रस्ता लवकरच करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात टाकेद धामणगाव ते टाकेद तीर्थ रस्ता काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत उर्वरित कामकाज सुरू करण्यात येणार आहे.”  – (अँड. माणिकराव कोकाटे, आमदार) 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here