Skip to content

Mumbai Murder | …अन् पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली बिल्डर पतीची हत्या

Malegaon Crime

Mumbai Murder |  विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने आपल्या प्रियकरासह मिळून पतीलाच संपवल्याची घटना उघडकिस आली आहे. ही घटना मुंबईतील सीवूड्स येथे शनिवार रोजी घडली होती. दरम्यान, आता या हाटीएमगे कोण होते? आणि यामागच नेमके कारण काय? याचा शोध पोलिसांनी घेतला आहे. बांधकाम व्यावसायिक मनोजकुमार सिंह याचे हत्या त्याच्याच पत्नीने व पत्नीच्या प्रियकराने केलेली असल्याचे गुपित तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी पत्नीचा प्रियकर राजू उर्फ शमसूल अबुहुरैरा खान (वय – २२) आणि बांधकाम व्यावसायिकाची पत्नी पुनम सिंह (वय – ३४) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Mumbai Murder)

अधिक माहितीनुसार, आरोपी राजू व पुनम या दोघांमध्ये प्रेमसंबध होते. या दोघांना मृत बांधकाम व्यावसायिक मनोजकुमार सिंहची मालमत्ता हडप करायची होती. त्यामुळेच त्यांनी ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मृत मनोजकुमार सिंह त्याच्या ऑफिसमध्ये एकटाच होता. यावेळी एका त्याच्यावर जड वस्तूने हल्ला करत त्याची हत्या कण्यात आली होती.(Mumbai Murder)

Crime patrol | ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘दृश्यम’ बघून आई, वडील आणि भावाला संपवले

Mumbai Murder | अशी केली हत्या

बांधकाम व्यावसायिक असलेल्या मनोजकुमार सिंह याची त्याच्या ऑफिसमध्येच हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुली आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. यानंतर या प्रकरणी एनआरआय पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता. कोणीतरी जवळच्याच व्यक्तीने मनोज सिंह याची हत्या केल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेला होता.

या गुन्ह्याची नोंद केल्यानंतर एनआरआय पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मृत बांधकाम व्यावसायिक मनोज सिंह याच्यावर आधीच फसवणूकीचे तब्बल तीन गुन्हे दाखल होते. दरम्यान, त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास सुरू केला होता.(Mumbai Murder)

Crime News | पत्नीने पाचवं लग्न केलं अन् चौथ्या पतीने पेट्रोल टाकून पेटवले

पोलिसांना आला संशय अन्… 

मयत बांधकाम व्यावसायिक मनोजकुमार सिंह याच्या हत्येचा तपास सुरू केला असता, त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य प्रेम संबंधाची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरोपी पत्नी पुनम सिंह आणि तिचा प्रियकर राजू उर्फ शमसूल अबुहुरैरा खान यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. त्याद्वारे ही हत्या या दोघांनीच केली किंवा घडवली असल्याचे उघडकीस आले आहे. मृत पतीची मालमत्ता मिळवण्यासाठीच त्याच्या पत्नीने आणि प्रियकराने मिळून त्याची हत्या केल्याचं उघडकीस आले. दरम्यान, पोलिसांनी या दोघं आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Mumbai Murder)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!