Skip to content

Crime patrol | ‘क्राईम पेट्रोल’ आणि ‘दृश्यम’ बघून आई, वडील आणि भावाला संपवले

Crime patrol

Crime patrol |  गुन्ह्यांशी संबंधित क्राईम पेट्रोल (Crime patrol) ही मालिका पाहून पोटच्या लेकानेच अपघाताचा बनाव दाखवत आपल्या आई-वडील आणि भावाचा खुन केल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना हिंगोली तालुक्यातील डीग्रस वाणी या शिवारात घडली आहे. चार दिवसांपूर्वीच या निर्दयी मुलाने सख्ख्या आई, वडील आणि भावाला संपवले होते. ही घटना आपघाताची नसून, हत्येची असल्याचे उघड झाले आहे. यामुळे परिसरासह संपूर्ण जिलह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तपासादरम्यान संशय आल्याने पोलिसांनी त्या कुटुंबातील मुलाची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. आई – वडील आणि भाऊ पैसे देत नाहीत व बदनामी करतात ह्याचा राग मनात धरून त्या मुलानेच तिघांची हत्या केल्याचे कबूल केले.(Crime patrol)

Crime News | पत्नीने पाचवं लग्न केलं अन् चौथ्या पतीने पेट्रोल टाकून पेटवले

Crime patrol | असा रचला हत्येचा कट… 

या प्रकरणातील आरोपीचे नाव हे महेंद्र जाधव असे आहे. दरम्यान, त्याने या हत्येचा कट हा दिवाळीपासूनच रचला होता. स्वतःच्याच आई-वडील व भावाला संपवण्यासाठी आरोपीने दिवाळीपासूनच ‘क्राईम पेट्रोल’ पाहायला सुरुवात केली. तसेच त्याने ‘दृश्यम’ हा चित्रपटदेखील तब्बल पाच वेळेस बघितला. यातून सर्व बारकावे लक्षात घेवून त्याने हत्येची तयारी करायला सुरुवात केली होती. आरोपी हा बेरोजगार होता. दरम्यान, त्याचा मृत धाकटा भाऊ विशाल जाधव हा गावातच पाणी पुरवठ्याचे काम करत होता. तेच आरोपीला खटकायचे.(Crime patrol)

आधी भावाला संपवले

आरोपी हा घरच्यांकडे सतत पैसे मागायचा. परंतु, त्याचे आईवडी त्याला पैसे देत नव्हते. तसेच तो कामधंदा करत नसल्याचे सांगत त्याला बोलायचे आणि त्याची बदनामी करायचे. याचाच राग मनात धरून त्याने ही हत्या केली. यासाठी त्याने स्वतःला झोप येत नसल्याचे खोटे कारण डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडून झोपेच्या गोळ्या लिहून घेतल्या आणि वाशिम येथून त्या गोळ्या घेतल्या. त्याने या गोळ्या त्याच्या भावाला चहामधून दिल्या आणि तो गाढ झोपेत असताना त्याच्या डोक्यात रॉड घालून त्याचा खून केला आणि त्याच रात्री गावाजवळच्या नालीत भावाचा मृतदेह फेकला.(Crime patrol)

Crime News | ….अन् चार मुलांचा बाप, पाच मुलांची आई असलेल्या मेहुणीला घेऊन फरार

नंतर, आई-वडीलांचाही खून केला 

यानंतर महेंद्रने खोटे कारण सांगून आईला शेतात नेले व तिलाही तिकडेच संपवून तिचा मृतदेह हा कापसात दाबून ठेवला. त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास वडिलांनाही झोपेच्या गोळ्या दिल्या. नंतर त्यांच्या डोक्यातही रॉडने वार करून त्यांचाही खून केला. नंतर दुचाकीवरून आई वडीलांचा मृतदेह भावाच्या मृतदेहाजवळ नाल्यात नेऊन टाकला आणि दुचाकीही तिथेच टाकली. त्यानंतर घारी येऊन त्याने घर स्वच्छ केलं.(Crime patrol)

पोलिसांनी खाक्या दाखवला अन्.. 

आपले आई-वडील आणि लहान भावाचा अपघातात मृत्यू झाल्याचे आरोपीने संभाजीनगर येथे राहणाऱ्या एका भावाला कळवलं. मात्र, तो येण्यापूर्वीच त्याने मृतदेह उचलण्याची आणि अपघाताची नोंद करण्याची घाई करत होता. त्यामुळेच पोलिसांचा त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी सूत्र फिरवले आणि आरोपीची चौकशी केली. त्यावरून पोलिसांनी सर्वप्रथम महेंद्र याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.(Crime patrol)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!