Skip to content

Breaking News | काँग्रेसची गळती सुरूच; ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा

Breaking News

Breaking News | लोकसभा निवडणुकांची चाहूल लागत असून सध्या संपुर्ण देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, सध्या काँग्रेस पक्षाला दिवसेंदिवस मोठे धक्के बसत असून काँग्रेस पक्षातील मोठ-मोठे नेते हे काँग्रेस पक्ष्याला रामराम ठोकत आहे. एका दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम राम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Milind Deora | १० – १५ दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप..?

Breaking News | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेस पक्षातून राजीनामा

यातच आता एक मोठी बातमी समोर येत असून आसाम येथील एका मोठ्या नेत्याने काँग्रेसला आपला राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अपूर्व कुमार भट्टाचार्जी यांनी काँग्रेस पक्षातून आपला राजीनामा दिला आहे. अपूर्व कुमार भट्टाचार्जी हे आसामचे ज्येष्ठ काँग्रेस नेते असून आसाम काँग्रेसचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते होते.

आता नुकताच त्यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. अपूर्व कुमार यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मणिपूरमध्ये काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरू झालेली आहे. अशातच आसाममधील अपूर्व कुमार भट्टाचार्जीच्या राजीनाम्याच्या धक्क्याने काँग्रेस पक्षाची चिंता वाढली आहे.

Breaking News | मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला राम राम

आगामी लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत अनेक मोठमोठ्या राजकीय घडामोडी होण्याच्या शक्यता आहेत. नुकतंच काल दक्षिण मुंबईमधील काँग्रेसचे कडवे समर्थक आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला राम राम करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला असून यामुळे आता काँग्रेसच्या गोटात भयाण शांतता पसरली होती. मिलिंद देवरा यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्ते आणि १० माजी नगरसेवकही काल शिंदे गटात सामील झाले आहेत.

Export Ban | निर्यातबंदीवर शेतकरी आक्रमक; मतदान बंदीचं झळकलं पहिलं बॅनर

दरम्यान, नुकतंच राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी येत्या १० ते १५ दिवसांत राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं सांगितलं असल्याने मिलिंद देवरा आणि आता अपूर्व कुमार भट्टाचार्जी यांचा पक्षातील राजीनामा आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!