Mumbai | राज्य शासनातर्फे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई येथे रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षा आणि टॅक्सी चलकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Mumbai)
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य शासन ‘महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ’ सुरू करण्यात येणार असून, या महामंडळाअंतर्गत रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवचासह विविध मदत देण्यात येणार आहे.
Shivjayanti 2024 | शिवजयंती निमित्त मुख्यमंत्र्यांची शिवनेरीवरून घोषणा…
Mumbai | महामंडळांतर्गत ‘या’ सुविधा
१. रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच
२. चालकाला आणि कुटूंबियांना मोफत वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक तरतूद
३. अपघातात जखमी झाल्यास ५० हजार रुपये इतकी तातडीची मदत
४. मुलांना शिष्यवृत्ती तसेच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत
५. चालकांच्या मुलांना तंत्रकुशल केले जाईल
६. मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य
७. ६३ वर्षांवरील चालकांना ग्रॅज्युईटीसाठी तरतूद केली जाईल. यासाठी चालकाला प्रतिवर्ष ३०० रुपये म्हणजेच दरमहा २५ रुपये मात्र जमा करावे लागतील.
दरम्यान, रिक्षा टॅक्सी चालकांच्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही घोषण केली असून, यामुळे आता रिक्षा टॅक्सी चालकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी राज्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मंत्री दादा भुसे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम आणि रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Mumbai)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम