Vanchit Bahujan Aghadi | मुंबईत मोठा राजकीय राडा होत असून, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोखून धरला आहे. तर, ह्या आक्रमक कार्यकर्त्यांची संख्या वाढतच असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या एका अनधिकृत कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेकडून पाडकामाची कारवाई करत बुल्डोजर चालवण्यात आले होते. यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसेच त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता देखील रोखून धरला आहे. गेल्या काही तासांमध्येच येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांची तथा पदाधिकाऱ्यांची संख्या वाढतच चालल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.(Vanchit Bahujan Aghadi)
Vanchit Bahujan Aghadi | नेमकं प्रकरण काय.?
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून गेल्या १५ फेब्रुवारी रोजी कुर्ला येथील चुनाभट्टी परिसरातील वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे कार्यालय पाडण्यात आले होते. तर, या विरोधात आज वंचितच्या कार्यकर्ते हे मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखून धरला होता.
Maratha Reservation | जरांगेंच्या डोक्यावर ‘या’ नेत्याचा ‘वरदहस्त’..?; महिलेचे गंभीर आरोप
यावेळी हे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की, त्यांनी थेट महापालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार देखील तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीत वंचितचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून, आता जोपर्यंत महानगरपालिका हे पडलेले कार्यालय पुन्हा उभे करुन देत नाही. तोपर्यंत आता वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. तसेच ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली असून, या प्रकरणी सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
Maratha Reservation | वृद्धांनी आमरण उपोषण करावे आणि जर..; असे होईल पुढील आंदोलन
राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली
आज सकाळच्या सुमारास वंचित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणारा रास्ता रोखत ‘रास्ता रोको’ केल्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या जमावाला पांगवले होते. पण आता गेल्या काहीवेळापूर्वी वंचितचे कार्यकर्ते हे पुन्हा आक्रमक झाले असून, त्यांनी पुन्हा कुर्ला स्थानकाकडे जाणारा रस्ता रोखला आहे. दरम्यान, एवढंच नाहीतर या आंदोलनाची माहिती पसरताच मुंबई शहरातील विविध भागातून वंचितचे कार्यकर्ते हे येथे दाखल होत असुन, ही संख्या वाढतच आहे. (Vanchit Bahujan Aghadi)
यामुळे मुंबई पोलिसांनी राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मागवली असून, गेल्या काही वेळापूर्वीच पोलिसांनी बळाचा वापर करत या कार्यकर्त्यांना जमावाला एका बाजूला मागे ढकलले होते. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ही थोडाफार प्रमाणात सुरु झाली असून, रस्त्याची एक बाजू मात्र अजूनही या आक्रमक कार्यकर्त्यांनी रोखलेली आहे. आता अतिरिक्त कुमक मागवून पोलीस या कार्यकर्त्यांवर कारवाई करणार असल्याचे दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम