सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे गाव (ता. देवळा) सह संपूर्ण देवळा तालुक्यात सुतार लोहार समाज बांधवाच्या वतीने गुरुवारी (दि. २२) रोजी प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. खर्डे (ता. देवळा) येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याच प्रमाणे देवळा, दहिवड, मेशी, खामखेडा आदी ठिकाणी समाज बांधवानी जयंती निमित्त मिरवणूक, प्रवचन, कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन केले होते.
Deola | वाखारवाडी येथील युवा शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
याप्रसंगी सरपंच अर्जुन मोहन ,उपसरपंच सुनील जाधव , प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव , भाऊसाहेब मोरे, माधव ठोंबरे, शशिकांत पवार, संदीप पवार, जितेंद्र पवार, शशिकांत ठाकरे, अशोक सोळसे, आदींसह सुतार लोहार समाज बांधव सर्वश्री किसन कुवर, रामकृष्ण कुवर, ह.भ.प तानाजी जगताप, सोमनाथ जगताप, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गोकुळ जगताप, पिंटू कुवर, माजी सैनिक किशोर जगताप, प्रकाश कुवर, पिंटू मीस्तरी, भानुदास जगताप, संजय कुवर, नंदू जगताप, साहेबराव जगताप आदींसह महिला उपस्थित होत्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम