Homosexual relationship | आई आणि मैत्रिणीचे समलैंगिक संबंध; मुलाची निर्घुण हत्या

0
68
Homosexual relationship
Homosexual relationship

Homosexual Relationship |  एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, या घटनेत जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या लेकाला तिच्या समलैंगिक नात्यामुळे संपवले आहे. इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या श्रेयांशु शर्मा याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. तर, या तपासाअंती एक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून सुमारे १७ किमी अंतरावर उत्तरपाडा गावात रविवारी (दि. १८ फेब्रुवारी) रोजी इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका १० वर्षीय चिमुकल्याची अतिशय निघृणपणे डोक्यात विटा आणि इतर जड वस्तूने वार करून आणि त्याच्या हाताच्या नसा कापून त्याची हत्या करण्यात आली होती. तर, यावेळी घरात कोणीही नव्हते. श्रेयांशुचे आई-वडील हे दोघेही नोकरी करत असून, घरातील इतर सदस्यही तयावेळी बाहेर गेले होते.(Homosexual relationship)

Vanchit Bahujan Aghadi | वंचितचे कार्यकर्ते आक्रमक; तूफान राडा तर, पोलिसांकडून बळाचा वापर

Homosexual relationship | लग्नाच्या आधीपासूनच होते समलैंगिक संबंध

या प्रकरणाचा तपास करत असतानाच पोलिसांना सुरुवातीलाच काही गोष्टी तपासातून उघड झाल्या. दारावर तोडफोड केलेली नाही. घरात एक पाळीव कुत्रा होता. कोणी अनोळखी व्यक्ती असली असती तर, तो लगेच भुंकला असता पण यावेळी कुत्र्याचे भुंकणेही कोणाच्या कानावर पडले नाही. घरातील सामानही जागेवरच होते, असे काही मुद्दे बघून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, त्यानंतर उघड झालेले प्रकरण हे अतिशय धक्कादायक होते.

मृत मुलाची आई शांता शर्मा हीचे तिची मैत्रीण इशरत हिच्यासोबत समलैंगिक नातेसंबंध असल्याचे समोर आले होते. शांता हीच्या लग्नाच्या आधीपासूनच या दोघींमध्ये नाते होते. तर, इशरतच्या जबाबानुसार, शांताच्या पतीलाही त्यांच्या या नात्याबाबत माहीत होते. पण गेल्या काही दिवसांपूर्वीच मृत मुलाने आपल्या वडिलांना, त्याची आई ही इशरतसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे सांगितले. ते त्याने पाहिले होते. त्या दिवसापासून या दोघीही चिंतेत होत्या.(Homosexual relationship)

Sex Racket | मुलगी, जावयाच्या मदतीने सासूच चालवायची सेक्स रॅकेट

आईनेच ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा

जर हे आणखी कोणाला समजले तर बदनामी होईल. याला घाबरून इशरत आणि मृत मुलाची आई शांता यांनी चिमूरड्याच्या हत्येचा कट रचला. आणि पूर्ण नियोजनानुसार १८ फेब्रुवारी रोजी रात्री या दोघींनी मिळून श्रेयांशुवर हल्ला केला. यात दोघांनी मिळून आधी त्याच्या डोक्यात विटांनी हल्ला केला. त्यानंतर घरात ठेवलेल्या गणेशमूर्तीने पुन्हा त्याच्यावर हल्ला केला.

एवढेच नाहीतर, क्रूरतेचा कळस म्हणून तुटलेल्या टेबलानेही त्याला चिरडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यानंतरही या दोघींचे समाधान झाले नाहीतर यांनी घरातल्या चाकूने त्याच्या हाताच्या नसा कापण्यासाठी अनेक वार केले. दरम्यान, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी आई आणि तिची मैत्रीण इशरत परवीन यांचे कॉल डिटेल्स, सीडीआर, घटनास्थळी असलेल्या बोटांचे ठसे अशा अनेक पुरावयांच्या आधारे उत्तरपाडा पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Homosexual relationship)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here