Uddhav Thackeray | आज पुणे येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शिव संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार, केंद्र सरकारवर टिका करत “अहमदशहा अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह” अशी जहरी टिका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली. (Uddhav Thackrey on Amit Shah)
यावेळी ते म्हणाले “आज जर आपण महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावून बघितले तर याच पुण्यावर शाहिस्तेखान हा चाल करून आला होता. मात्र शाहिस्तेखान जरा हुशार होता. त्यामुळे तीन बोटावरच निभावून गेल्यानंतर तो तेव्हा गेला तो परत कधीच आला नाही. तसंच शहाणपण जर का काही लोकांनाही घेता आलं असतं तर तेही परत कधीच आले नसते.
Uddhav Thackrey | आता रामाच्या नावाने मतं मागताय नंतर देशाला काय देणार घंटा; ठाकरेंची तोफ कडाडली
अहमदशहा अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह
पण ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि का आले तर ते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना जे फटके दिले. त्याचे वळ कुठे कुठे पडले आहेत. त्याची चाचपणी करण्यासाठी ते महाराष्ट्रात आले होते आणि ही परत आलेली व्यक्ती म्हणजे अहमदशहा अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह होय. कारण तो देखील शाहाच होता आणि हे देखील शहाच आहेत. अशी बोचरी टिका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहा (Amit Shah)यांच्या पुण्यातील सभेवर केली.
Uddhav Thackrey | उद्धव ठाकरेंच्या मोठ्या नेत्याच्या घरी एसीबीची धाड
Uddhav Thackeray | विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही…
तर, पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की,”नवाब शरीफ यांचा केक खाणारे तुम्ही, आणि आता तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का? शंकराचार्य म्हणाले त्याप्रमाणे विश्वासघात करणारा हा कधीही हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमचा विश्वासघात केला असल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम