Nashik Crime | नाशकात भरदिवसा एकाचा खून अन् पोलिस अधिकाऱ्यांवर चाकूने हल्ला

0
59
Nashik Crime
Nashik Crime

नाशिक :  नाशिकमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, अनेक खुनाच्या, लुटमारी, आणि फसवणुकीच्या घटना सध्या समोर येत आहे. यातच थेट पोलिस (Nashik Police) अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आल्याने शहरात पोलिसांचा धाक आहे का..? असा संतप्त सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

शहरातील नाशिकरोड सिन्नर फाटा येथे भरदिवसा एका व्यक्तीवर तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला असून, यात 38 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 2 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. नाशिकरोड सिन्नर फाटा येथील यश टायर्स या दुकानासमोर दुचाकीवर बसलेल्या 38 वर्षीय प्रमोद वाघ याच्यावर तीन जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यात प्रमोद वाघ याचा मृत्यू झाला आहे.(Nashik Crime)

Nashik Crime | नाशिकमध्ये भुतबाधा झाल्याचे सांगत भोंदू मौलानाकडून महिलेवर अत्याचार

Nashik Crime |  नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, नाशिकरोड सिन्नर फाटा परिसरात प्रमोद वाघ याच्यावर अज्ञात तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेचे कथित सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून यात हल्लेखोर अत्यंत निर्घृणपणे प्रमोद वाघ याच्यावर हल्ला करताना दिसत आहेत. जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. (Nashik Police)

दरम्यान, हल्ला करून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होता. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रमोद वाघ याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस पुढील तपास करत आहेत. (Nashik Crime)

Nashik Crime | नाशिकमध्ये गुंडांनी मिरवणूक काढलेल्या ‘बॉस’ची नाशिक पोलिसांनी काढली धिंड

नाशिकमध्ये पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला

एकीकडे नाशिकरोड मधील ही घटना उघडकीस आली असताना दुसरीकडे नाशिक शहरातील सिडको परिसरातील केवल पार्क परिसरात बांधकामाच्या मुद्द्यावरून दोन गटांत वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर येथे पोलिसांनी हस्तक्षेप केला असता, यातील एका गटाने थेट एका पोलीस अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केला असून, याआठ ते दहा जणांनी केलेल्या भ्याड हल्यात पोलीस निरीक्षक सुनील पवार हे जखमी झाले आहेत. तर त्यांच्यासह उपनिरीक्षक सविता उंडे यांच्याशीही यावेळी संशयितांनी शिवीगाळ धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. (Nashik Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here