UCC | अमित शाहांनी जाहीर केले; ‘समान नागरी कायदा’ कधीपासून लागू होणार?

0
26
UCC
UCC

UCC |  देशात समान नागरी कायदा लागू होणार का? आणि कधी? यावर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्पष्टपणे बोलले आहेत. ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे‘ या सत्ता संमेलनाच्या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय गृहमंत्र्यांनी समान नागरिक कायद्याबद्दल भाष्य केले आहे. भारतात निवडणुकांनंतर समान नागरिक कायदा लागू होणार असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे. तर, याआधी विश्लेषण केलं जाणार असल्याचेही ते म्हणाले.

सगळ्यांसाठी UCC हा एक राजकीय मुद्दा असले. मात्र, हा सामाजिक सुधारणेचा विषय आहे. देशात कुठल्या धर्माच्या आधारावर कायदा नको, ही आपल्या लोकशाहीची मागणी आहे. देशाचा कायदा हा येणाऱ्या परिस्थितीच्या अनुकूल आणि जनतेच्या हिताचा असायला हवा, असंही ते यावेळी म्हणाले.(UCC)

काँग्रेसला अचानक काय झालं समजत नाही ?

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही सांगत आलोय की, “३७० कलम हटवणार, देशात समान नागरिक कायदा आणणार, तीन तलाकची प्रथा बंड करणार आणि अयोध्येत श्री राम मंदिर तयार करणार. संविधान सभेत जवाहर लाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आज़ाद, के एम मुंशी हे होते आणि या सर्वांनीच समान नागरिक कायद्याचा मुद्दा मांडला होता. मात्र आता काँग्रेसला अचानक काय झालं समजत नाही ? कमीत कमी त्यांनी आपल्या आजोबांची गोष्ट तरी लक्षात ठेवावी.

Hemant Godse | काय सांगता..! नाशिकचे विद्यमान खासदार पुन्हा ठाकरे गटात परतणार..?

UCC | यूसीसी कायदा लागू झालाय…

“उत्तराखंड राज्यात समान नागरिक कायदा हा लागू झाला आहे. याची सोशल, ज्यूडीशियल व वैधानिक स्क्रूटनी झाली पाहिजे, असंही अमित शाह यावेळी म्हटले. उत्तराखंड सरकारने राज्यात यूसीसी आणला आहे. आगामी निवडणुकीपर्यंत त्याची स्क्रूटनी तयार होईल आणि निवडणुकीनंतर सर्व राज्य विचार करून संपूर्ण देशात समान नागरिक कायदा लागू केला जाईल”. उत्तराखंडमध्ये UCC लागू झाल्याच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, “ही खूप मोठी सुधारणा असून, यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे. आणि त्यानंतर देशात हा कायदा लागू झाला पाहिजे.”(UCC)

Budget Session 2024 | अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ घोषणा

यूसीसीवरुन गैरसमज निर्माण केले जात आहेत

समान नागरिक कायद्याला हिंदू कोड बिल बोललं जात असल्याच्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, “काही लोकं हे भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू धर्माच अनुकरण करणाऱ्यांनी सामाजात अनेक सुधारणा या स्वीकारल्या आहेत. आम्ही देशात हुंडा विरोधी कायदा तयार केला त्यावेळी कोणी विरोध केला नाही. त्यानंतर सती प्रथा बंद केली. बहुपत्नी ही प्रथादेखील समाप्त केली याला कोणी विरोध केला नाही. मात्र, यूसीसीवरुन अनेक गैरसमज निर्माण केले जात आहेत.”(UCC)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here