TuljaBhavani Temple | तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ; आता अलंकारांची ‘इन कॅमेरा’ तपासणी

0
54
TuljaBhavani Temple
TuljaBhavani Temple

TuljaBhavani Temple |  महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर भाविक तुळजा भवानी मंदिरात (TuljaBhavani Temple) दर्शनासाठी जातात. मोठ्या संख्येने भक्त परिवार देवीच्या चरणी लीन होतात. नवस करतात आणि भक्तीभावाने देणगी किंवा दागदागिने देवीला अर्पण करतात. तुळजाभवानी देवस्थान हे राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून, येथे कायम भाविकांची गर्दी असते. दरम्यान, याच तुळजाभवानी मंदिरातून काही प्राचीन आणि मौल्यवान अलंकार गहाळ झाल्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

अलंकारांच्या वजनात तफावत

हे प्रकरण उघडकिस आल्यानंतर आता तुळजाभवानी देवीच्या (TuljaBhavani Temple) प्राचीन आणि मौल्यवान अलंकारांची पुरातत्व विभाग तज्ज्ञांकडून इनकॅमेरा (In Camera) तपासणी केली जाणार आहे. यापूर्वी मंदीर समीतीच्या विविध समित्यांच्या मोजणीदरम्यान देवीच्या प्राचीन आणि मौल्यवान अलंकारांच्या वजनात तफावत आढळून आली होती. त्यामुळे आता अलंकारांची इन कॅमेरा तपासणी केली जाणार आहे.

Yellamma Devi | यल्लमा देवीच्या मंदिरात पादुकांसह लाखोंचे दागिने लंपास

TuljaBhavani Temple |  हे अलंकार गहाळ 

या प्रकरणी विशेष म्हणजे या प्राचीन अलंकारांचे वजन कमी होण्याऐवजी काही अलंकाराच्या वजनात वाढ झाल्याच्याही नोंदी आढळल्या आहेत. तसेच तुळजाभवानी देवीच्या २७ अलंकारांपैकी ४ अलंकार गहाळ झाले असून, १२ पदरी ११ पुतळ्या असलेले मंगळसूत्रही गायब झाले आहेत. या प्रकरणी महंतासह, सेवेकरी पलंगे आणि तत्कालीन धार्मिक व्यवस्थापकांवर गुन्हा  दाखल केला होता.

सोन्याचा मुकुट आणि इतर दागिने चोरी

दरम्यान, या प्रकरणी आता आमदार महादेव जानकर यांनी विधान परिषदेत प्रश्न केला होता. तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट आणि इतर काही दागिने चोरी झाले होते. भक्त मोठ्या श्रद्धेने सोन्याचे दागिने किंवा मौल्यवान वस्तू देवीला अर्पण करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही मंदिर प्रशासनावर असते. मात्र, समोर आलेल्या माहितीनुसार तुळजाभवानी देवीच्या २७ अलंकारांपैकी ४ अलंकार गायब झाले असून १२ पदराच्या ११ पुतळ्या असलेल्या मंगळसूत्रही गहाळ झाले आहे.

तर, आता या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख हे पुरातत्व विभाग आणि सोने तज्ज्ञांच्या मदतीने १ ते ७ डब्यातील देवीच्या पुरातन अलंकारांची तपासणी करणार आहेत. तसेच विविध रजिस्टर, फोटो अल्बमनुसार देखील पाहणी करून दागिन्यांच्या नव्याने नोंदी घेतल्या जाणार आहे आणि यासाठी सोने तज्ज्ञांचे एक पथक तुळजापूर येथे दाखलही झाले होते.

Crime news | सोन्याचे दागिने लांबवलेच पण, तरुणीचेही केले अपहरण


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here