Crime news | सोन्याचे दागिने लांबवलेच पण, तरुणीचेही केले अपहरण

0
1

Crime news | पाच ते सात दरोडेखोरांनी चाकू व बंदुकीचा धाक दाखवत सोने-चांदीच्या दागिन्यांसह २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केले आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे घडलेल्या या घटनेमुळे आता जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. राहत्या घरातून तरूणीचे अपहरण केल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरणआहे. याप्रकरणी, साक्री पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री ह्या शहरात एका घरात काही अज्ञातांनी दरोडा टाकून ८८ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने लांबवत तरुणीचेही अपहरण केले आहे. दरम्यान,  पोलिसांनी काही तासांतच सहा संशयितांना ताब्यात घेतलेले आहे. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क बांधलेला असून, ते हिंदीत बोलत असल्याचे फिर्यादी महिलेने सांगितले आहे.

लाँचपूर्वीच OnePlus 12 च्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि व्हेरिएंट्सची माहिती व्हायरल

सहा संशयित ताब्यात

साक्री येथील नवापूर रस्त्यावरील भांडणे शिवारातील सरस्वती कॉलनीत वास्तव्यास असलेल्या ज्योत्स्ना पाटील (वय -४०) व त्यांची भाची निशा शेवाळे ह्या दोघी घरात टीव्ही बघत असताना घराचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज त्यांना आला. दरम्यान, घराचा दरवाजा उघडला असता सहा अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला व दोघींना धारदार शस्त्राचा धाक दाखवला.

तसेच त्यांच्या कपाटातील तिजोरीतून सुमारे ८८ हजार पाचशे रुपये इतक्या किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले.   तसेच ज्योत्स्ना पाटील यांचे हातपाय बांधत भाची निशा शेवाळे हीचे अपहरण करून तिला सोबत नेले. याप्रकरणी साक्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी काही तासातच एकूण सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत संजय आवटे यांचा ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव

घरात एकटी असल्याने भाचीला बोलावले 

ज्योत्सना पाटील यांचे पती हे काही कामानिमित्त संगमनेर येथे गेलेले होते. ज्योत्सना ह्या घरी एकट्या असल्याने त्यांनी भाची निशा शेवाळे हिला झोपण्यासाठी त्यांच्या घरी बोलावून घेतले होते. निशा ही एका मेडिकल शॉपमध्ये काम करते.  रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरोडेखोरांनी तोंडाला मास्क लावलेले होते. तसेच त्यांच्या हातात बंदूक व चाकूही होता. दरोडेखोरांनी कपाटातील दागिने पळवलेच पण अंगावरील दागिने देखील हिसकावले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here