Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय..!

0
67
Manoj Jarange
Manoj Jarange

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली असून, यानुसार पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने (Pune Court) मनोज जरांगे यांच्यावर दाखल एका गुन्ह्याप्रकरणी त्यांना जारी करण्यात आलेले अटक वॉरंट रद्द केले आहे. २०१३ मध्ये दाखल एका गुन्ह्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. आज त्या प्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हे न्यायालयात हजर राहिले होते. दरम्यान, या सुनावणीनंतर न्यायालयाने मनोज जरांगे यांना जारी करण्यात आलेले अटक वॉरंट रद्द केले आणि त्यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Manoj Jarange | तुला तंगडीसकट बाहेर ओढतो; ४ जूनला मराठ्यांनी अंतरवालीला या

Manoj Jarange |नेमकं प्रकरण काय..?

२०१३ मध्ये मनोज जरांगे यांच्या शिवबा संघटनेने एका नाटकाचे आयोजन केले होते. या नाटकाचा प्रयोग झाला. मात्र, त्याचे पैसे न दिल्याचा आरोप मनोज जरांगे यांच्यावर करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी त्यांच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी जरांगे पाटील यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन मिळालेला होता. याच प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. दुपारी १२ वाजता जरांगे पाटील हे पुणे न्यायालयात पोहचले. यावेळी सुनावणीसाठी जाताना त्यांनी “मी न्यायालयाचा प्रचंड आदर करतो आणि न्याय हा सर्वांसाठी समान आहे” अशी प्रतिक्रिया दिली होती.(Manoj Jarange)

Manoj Jarange | मला हलक्यात घेऊ नका..; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here