Trimbakeshwar | ‘दुष्काळाचे सावट दूर होवुदे’; पालकमंत्र्यांचे निवृत्तीनाथांना साकडे

0
26
Trimbakeshwar
Trimbakeshwar

Trimbakeshwar |  आज षटतिला एकादशी आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा आहे. या वर्षी निवृत्तीनाथ महाराजांच्या या समाधी सोहळ्याला ७२६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे यानिमित्ताने आज यात्रा असून, अवघ्या त्र्यंबक नगरीत वैष्णवांची मांदियाळी भरली आहे. अवघी त्र्यंबक नगरी ही टाळ, मृदुंगांच्या गजरात दुमदुमली आहे. यावर्षी सर्वाधिक ८०० दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये आल्या असून, लाखोंच्या संख्येने भाविक याठिकाणी दाखल झाले आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच यात्रेसाठी निधी 

यंदाच्या या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. तर, नगरपरिषदेतर्फे भाविकांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नांतून इतिहासात पहिल्यांदाच यंदाच्या या यात्रेसाठी महाराष्ट्र सरकारतर्फे तब्ब १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहिर केले आहे.(Trimbakeshwar)

Shattila Ekadashi | आजच्या ‘षटतिला एकादशी’ला हे उपाय कल्याने होईल धनलाभ

आज पहाटेपासूनच त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी त्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर त्यांनी यात्रास्थळाची तसेच यात्रेस आलेल्या वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी- सुविधांची पाहणी केली. यात्रोत्सव काळात येणा-या वारकरी, भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्यात.

पालकमंत्र्यांचे साकडे 

राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होवुदे, अशी प्रार्थना मंत्री दादा भुसे यांनी निवृत्तीनाथांच्या चरणी केली. दिंडींची आणि वारकऱ्यांची संख्या वाढली असून, भाविकांच्या सोयीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. संस्थानच्या विकासापासून ते वारकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पहिल्यांदाच राज्याच्या कुणी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. इतके चांगले नियोजन केल्याबद्दल विश्वासतांचेही अभिनंदन. कुंभमेळा आराखड्यात समावेश करून येथे अजून काय विकास करण्यात येईल त्यासाठी शासन कटिबध्द असल्याची भावना यावेळी दादा भुसे यांनी व्यक्त केली. (Trimbakeshwar)

Trigrahi Yoga | कोणत्या राशीच्या लोकांना ‘त्रिग्रह ग्रह’ योगाचा फायदा..?

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात 

यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये झालेली गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात २ डीवायएसपी, ६ पीआय, २१ पुरुष पीएसआय आणि एपीआय, ४ महिला अधिकारी, २१० महिला व पुरुष पोलिस अंमलदार यांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या या यात्रेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.(Trimbakeshwar)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here