Trigrahi Yoga | कोणत्या राशीच्या लोकांना ‘त्रिग्रह ग्रह’ योगाचा फायदा..?

0
77
Trigrahi Yoga
Trigrahi Yoga

Trigrahi Yoga | ग्रहांच्या चालीनुसार काही राशींमध्ये यामुळ काही विशेष योग तयार होणार आहेत. तब्बल ३० वर्षानंतर कुंभ राशीत शनि देव विराजमान झाले आहेत. त्यामुळे आता या राशीत कोणताही ग्रह सोबतीला असला तर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. तब्बल अडीच वर्षांसाठी कुंभ राशीत शनिदेव विराजमान आहेत. दरम्यान, आता त्यापैकी आता एक वर्ष संपले आहे. तर इतर ग्रह हे काही कमी किंवा जास्त कालावधीनंतर गोचर करतात. त्यामुळे आता आणखी दीड वर्ष कुंभ राशी शनिच्या सान्निध्यात असणार आहे.

दरम्यान, सध्या शनिसोबत आणखी दोन ग्रहांची युती होणार असून, त्यातील पहिला म्हणजे सूर्य आणि दुसरा म्हणजे बुध आहे. कुंभ राशीत तब्बल ३० वर्षानंतर शनि, सूर्य, आणि बुध या तीन ग्रहांची युती होणार आहे. तर, १३ फेब्रुवारी रोजी सूर्य ग्रह हा कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी बुध ग्रह हादेखील कुंभ राशीत येणार असून, यामुळे आता २० फेब्रुवारीपासून ‘त्रिग्रही योग’ असणार आहे. ७ मार्चनंतर बुध ग्रह हा मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर सूर्य ग्रह हादेखील १४ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कुंभ राशीतील त्रिग्रही योग हा १६ दिवस राहणार आहे. त्यामुळे या १६ दिवसात तीन राशींच्या लोकांना विशिष्ट लाभ मिळणार आहे.(Trigrahi Yoga)

Lakshmi Narayan Yog | ‘या’ शुभ संयोगामुळे काही राशीच्या लोकांची भरभराट

मेष राशी –

मेष राशीच्या एकादश भावात तीन ग्रहांची युती होत असून, यामुळे मेष राशीच्या लोकांना याकाळात तीन ग्रहांचं बळ मिळणार आहे. या त्रिग्रह योगामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये नवी उंची गाठण्याची संधी मिळू शकते. जे लोक विदेशात नोकरीसाठी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या लोकांनाही या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायिकांबद्दल बोलायचं झालं तर, या काळात त्यांच्यासाठी प्रगतीची नवी दारं खुली होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून चांगला फायदाही होण्याची शक्यता आहे.(Trigrahi Yoga)

Trigrahi Yoga | वृषभ राशी –

वृषभ राशीच्या दशम स्थानात हा ‘त्रिग्रही योग’ तयार होणार आहे. उत्पन्नाचं स्थान असल्याने नवे मार्ग सापडतील. यामुळे हातात पैसा टिकून राहील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढही होऊ शकतो. काही किचकट कामं पूर्ण करण्यासाठीदेखील हा कालावधी उत्तम असेल. जितकी चांगली आणि मोठी कामं तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील ते करण्याचा प्रयत्न करा.

Deola | आ. आहेर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा

मिथुन राशी –

मिथुन राशीच्या नवम स्थानात ‘त्रिग्रह योग’ तयार होत असून, यामुळे तुमची बरीच मोठी कामं मार्गी लगतील. एखाद्या लांबच्या प्रवासाचा योगही जुळून येऊ शकतो. तसेच, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नव्या संधी चालून येतील. तुम्हाला मनासारखा पगार व पद मिळेल. आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल. मात्र, तुमच्या शत्रूंना तुमच्या प्रगतीमुळे त्रास होईल.(Trigrahi Yoga)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here