Shattila Ekadashi | आजच्या ‘षटतिला एकादशी’ला हे उपाय कल्याने होईल धनलाभ

0
63
Shattila Ekadashi
Shattila Ekadashi

Shattila Ekadashi |  आज ‘षटतिला एकादशी’ आहे. धार्मिक मान्यतेनुसार, कन्यादान, हजार वर्ष तपश्चर्या व सुवर्ण दान केल्यानंतर जितके पुण्य मिळते. त्यापेक्षा जास्त फळ हे एका षटीला एकादशीच्या दिवशी पुढील पद्धतीने व्रत केल्याने मिळते. षटतिला एकादशीला केलेल्या या व्रतामुळे धनाचे फळ व उत्तम आरोग्य मिळते. या पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी ६ फेब्रुवारीला म्हणजेच आज ‘षटतिला एकादशी’ असून, या दिवशी एकादशी निमित्त उपवास केल्याने व्रतकर्त्याला मोक्ष प्राप्ती होते. त्यामुळे या एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या एकादशीच्या पूजेला तिळाचा उपयोग केला जातो. तर, या एकादशीच्या पूजेला तिळाचा वापर तब्बल सहा प्रकारे केला जातो. त्यामुळे या एकादशीला ‘षटतिला एकादशी’ म्हणतात. तर, असा आहे आजच्या या पूजेचा मुहूर्त, महात्म्य, व्रत पद्धती…(Shattila Ekadashi)

Shattila Ekadashi | आजचा मुहूर्त 

  • पंचांगानुसार, आज पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील ही एकादशी ५ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी सुरू होऊन ६ फेब्रुवारी संध्याकाळी ४ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे.
  • आजच्या पुजेचा मुहूर्त – ६ फेब्रुवारी सकाळी ९ वाजून ५१ मिनिटांनी सुरू होऊन दुपारी २ वाजून २ मिनिटांनी संपणार आहे.

Horoscope 4 February | ‘या’ लोकांनी आज सावध असावे; वाचा आजचे राशीभविष्य

या वेळेत सोडा उपवास 

  • ७ फेब्रुवारी सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी ते ९ वाजून १९ मिनिटे
  • द्वादशी संपण्याची वेळ  – दुपारी २ वाजून २ मिनिटे (Shattila Ekadashi)

‘या’ सहा पद्धतींनी करा तिळाचा वापर? 

आजच्या या ‘षटतिला एकादशी’च्या दिवशी पुढील पद्धतीने तीळाचा वापर केल्याने पुण्य मिळते. तथा धनलाभही होतो.

  • अंघोळीच्या पाण्यात तिळ घालून स्नान करावे.
  • तिळाचे उटणे लावून आंघोळ करावी.
  • तिळाचे हवन करावे.
  • तिळाचे तर्पण करावे.
  • जेवणात तिळाचा समावेश करावा.
  • आजच्या दिवशी तिळाचे दान करावे. वरील पद्धतीने आजच्या दिवशी तिळाचा वापर केल्याने स्वर्गप्राप्ती होण्यास मदत होते. (Shattila Ekadashi)

Trigrahi Yoga | कोणत्या राशीच्या लोकांना ‘त्रिग्रह ग्रह’ योगाचा फायदा..?

असे आहे ‘षटतिला एकादशी’चे महत्त्व  

तुम्हाला जर जीवनात यश मिळवायचे असेल तर, आजच्या या एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल व तीळ मिसळून या पाण्याने स्नान करावे. आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद असतो. तसेच वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध असते. आजच्या या व्रताची कथा ऐकल्याने किंवा वाचल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. हे व्रत केल्याने लोकांना त्यांच्या पापांपासून किंवा कुकर्मांपासून मुक्ती मिळते. तसेच तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी व भरभराट येते. या दिवशी भगवान विष्णूची आराधना करतात. पूजा केल्यानंतर षटतिला एकादशीची व्रत कथाही अवश्य ऐकावी, अन्यथा या व्रताचे फळ मिळत नाही.(Shattila Ekadashi)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here