Trimbakeshwar | नाशिक जिल्हा हा धार्मिक स्थळांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे प्रभू श्री रामांच्या पदस्पर्शाने पावन असलेली पंचवटी, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले सप्तश्रुंग निवासीनी देवी मंदिर, तसेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, यामुळेच नाशिकला राज्याची ‘धार्मिक राजधानी’ देखील म्हटले जाते. दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरवात ही देवदर्शन करत नाशिककरांनी उत्नसाहाने व धार्मिक पद्धतीने केली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांवर आज नाशिककर भाविकांनी तुफान गर्दी केल्याचे बघायला मिळाले. नाशिकला लाभलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. ह्या मंदिरामध्ये शंभूमहादेवाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी अलोट गर्दी केली होती. (Trimbakeshwar)
Trimbakeshwar | भाविकांमधून नाराजीचा सूर
दरम्यान, याठिकाणी नाशिक मधूनच नाहीतर गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली यासह अनेक राज्यातून भाविक भक्तांनी त्र्यंबकमध्ये प्रचंड गर्दी केली असून, यामुळे संस्थानाचे नियोजन बिघडल्याचे दिसून आले. नियमित दर्शन रांगेतूनच भाविकांना दर्शन घेण्यासाठी किमान चार ते पाच तास लागत होते. त्यामुळे नियमित दर्शनाच्या व्यतिरिक्त मंदिरात २०० रुपये इतकी देणगी देऊन भक्तांच्या प्रवेशाची व्यवस्था केली जाते.
Nashik News | नाशिक मनपाकडून नाशिककरांना मिळणार मोठी सुविधा
परंतु, ही व्यवस्थाही कधी सुरु असते तर कधी बंद ठेवण्यात येते. यामुळे येथे आलेल्या भाविकांना दर्शनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दर्शनासाठी तुफान गर्दी झाल्याने अनेक भाविकांना दर्शन न घेताच आल्या पाउली माघारी फिरावे लागले आहे. यामुळे योग्य सोयी, सुविधा उपलब्ध व झाल्याने यावेळी भाविकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. तसेच हि भाविकांची गर्दी बघूनदेखील मंदिर व्यवस्थापनाकडून भाविकांसाठी कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त नियोजन केले नसल्याची तक्रार याआधी पुरोहित संघाच्या सदस्यांनी दिली होती. (Trimbakeshwar)
देवदर्शनाचा धंदा बसवणारी टोळी सक्रिय
तसेच याठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे गेल्या अनेक दिवसांपूर्वी दोनशे रुपये थेट दर्शनाची तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. याचाच फायदा घेत देवदर्शनाचा धंदा बसवणारी टोळीदेखील सक्रिय झाल्याचे यावेळी बघायला मिळाले. भाविकांच्या गर्दीची पाहणी करत असतांना विश्वस्त हे उत्तर दरवाजाजवळ फेरफटका मारत असताना यावेळी गुजरातमधील ११ भाविकांना दर्शनासाठी जाता येईल का, अशी कुजबुज त्यांच्या कानावर आली.
Nashik Corona | नाशिककरांनो काळजी घ्या! जिल्ह्यात कोरोनाचे तीन शिकार
दरम्यान, यावेळी त्यांनी संबंधित भक्तांशी संवाद साधला असता, त्यांनी “आम्ही दोनशे रुपये हे दर्शनबारीत उभे राहण्यासाठी घेत होतो. मात्र, ती बंद असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही व्यक्तींनी तुम्हाला दर्शनासाठी जायचे आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकी दोन हजार इतके पैसे लागतील असे सांगितले. तसेच त्या व्यक्तीलाही विश्वस्तांसमोर उभे करण्यात आले. यावर विश्वस्तांनी संबंधित व्यक्तीला चांगलीच तंबी दिली असल्याची चर्चा आहे. (Trimbakeshwar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम