२०२७-२८ त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर; प्रथम शाही स्नान २ ऑगस्ट २०२७ रोजी


त्र्यंबकेश्वर – सन २०२७-२८ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या. ध्वजारोहण ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून २ ऑगस्ट २०२७ ला प्रथम शाही स्नान पार पडणार आहे.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज सध्या त्र्यंबकेश्वर येथे त्यांच्या जुन्या आखाड्यात आले असून त्र्यंबकेश्वर पुरोहित संघातर्फे सिंहस्थ कुंभमेळा कालावधी सुरू होण्यापासून ते सिंहस्थ ध्वजपर्व व शाही स्नानाच्या तारखा पंचांगासह महंत हरीगिरीजी महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.

माजी अध्यक्ष जयंत शिखरे, प्रवक्ते राजेश दीक्षित यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर केल्या. महंत सागरानंद सरस्वती, शिवगिरीजी महाराज, विष्णुगिरीजी महाराज, निळकंठगिरीजी महाराज आदि साधू, महंत यावेळी उपस्थित होते.

सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२०२८ तारखा

ध्वजारोहण सोहळा – अश्विन वद्य षष्ठी – ३१ ऑक्टोबर २०२६

प्रथम शाही स्नान – आषाढ कृष्ण अमावस्या – २ ऑगस्ट २०२७

द्वितीय शाही स्नान – श्रावण वद्य अमावस्या – ३१ ऑगस्ट २०२७

तृतीय शाही स्नान – भाद्रपद शुद्ध द्वादशी (वामन द्वादशी) – १२ सप्टेंबर २०२७

ध्वजावतरण – श्रावण शुद्ध तृतीया – २४ जुलै २०२८

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!