Skip to content

अल्ट न्यूजचा सहसंस्थापक झुबैरला न्यायालयीन कोठडी


अल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबैर याचा जमीन अर्ज फेटाळत आज दिल्लीतल्या पटियाला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली होती.

अल्ट न्यूजची मातृसंस्था असलेल्या प्रवरा मिडियाचा झुबैर हा एक संचालक असून त्याने २ लाख रुपयांच्या देणग्या ह्या पाकिस्तान, सीरिया आणि आखाती देशांतून मिळवल्याचा आरोप आहे. तसेच त्याने हे सर्व पुरावे अत्यंत चलाखीने मिटवले आहे. त्यामुळे झुबैरला जामीन देण्यात येऊ नये, अशी मागणी दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. 

दिल्ली पोलिसांनी असाही दावा केला की, तो रेझरपे या पेमेंट गेटवेच्या माध्यमातून झुबैरने ऑस्ट्रेलिया, बँकॉक, यूएई, फिनलंड, अमेरिका, स्कॉटलंड आदि देशांतून त्याने हे पैसे स्वीकारले. तसेच हे सर्व पैसे झुबैरच्या मोबाईलवरून पाठवण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले. 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!