आजचे राशी भविष्य 23 जून

0
2

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: तुमच्या स्वभावात क्रोध, राग दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. कार्यालयात वातावरण चांगले असेल. शुभ रंग – हिरवा.

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: भाऊ तसेच इतर नातेवाईकांसोबत सुरू असलेल्या व्यवहारात चांगला लाभ होईल. कामाच्या व्यापामुळे ताण जाणवण्याची शक्यता आहे. शुभ रंग – केशरी.

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना दिवस चांगला असेल. दिलेली जबाबदारी वेळेआधी पूर्ण करतील आणि वरिष्ठांची मनं जिंकतील. शुभ रंग – निळा.

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: कार्यालयातून दिलेलं काम पूर्ण कराल. प्रवासाचा किंवा पर्यटनाचा योग महिन्याभरात निर्माण होईल. शुभ रंग – पांढरा.

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी चालून येईल. व्यापाऱ्यांना मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – पांढरा.

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यावसायिक क्षेत्रात तुमच्या कार्याचं खूपच कौतुक होईल. कामात चांगले यश प्राप्त होईल. स्थावर संपत्ती वाढण्याचा योग निर्माण होईल. शुभ रंग – पिवळा.

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. जीभेवर ताबा ठेवा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. नव्या कामाची सुरूवात करण्यास दिवस चांगला आहे. शुभ रंग – निळा.

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कामात चांगले यश प्राप्त होईल. वायफळ खर्च टाळा. प्रवासाचा योग लवकरच निर्माण होईल. शुभ रंग – लाल.

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणामुळे पैसे अधिक खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग – पांढरा.

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. मन प्रसन्न असेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. साहित्य, कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस चांगला असेल. शुभ रंग – पिवळा.

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. व्यापाऱ्यात लाभ होईल. शुभ रंग – लाल.

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. वाद-विवाद टाळा. कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. शुभ रंग – निळा.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here