Skip to content

जळगावमध्ये ही राजकीय घडामोडी: शिवसेनेच्या महापौरांनी खडसेंची घेतली भेट


 

जळगाव : शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी करत महाराष्ट्रात राजकीय भूकंप के आहे. त्यामुळे महा विकास आघाडी सरकार अल्पमतात आली आहे. मुंबईमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडी क्षणा क्षणाला होत असताना आता जळगाव मध्ये राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. जळगाव शहराचे शिवसेनेचे महापौर जयश्री महाजन व त्यांचे पती सुनील महाजन यांनी अचानक एकनाथ खडसेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

महापौर व त्यांचे पती सुनील महाजन यांचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर जयश्री महाजन या महापौर झाल्या होत्या. शिंदे नगरविकास मंत्री असल्याने महापालिकेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीही शिंदे यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यातच आज महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पती महापालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांची आज भेट घेतली.

खडसेंच्या यांचे अभिनंदनासाठी गेलो

एकनाथ खडसे यांच्यासोबत सलोख्याचे संबंध आहेत. विधान परिषद निवडणुकीत त्यांचा विजय झाल्याने त्याबद्दल त्यांचे अभिनंदनासाठी मुक्ताईनगरात आल्याचे स्पष्टीकरण महापौर जयश्री महाजन यांनी दिले आहे.

राजकीय परिस्थितीवरही चर्चा

महाराष्ट्रात व शिवसेनेत घडलेल्या राजकीय परिस्थितीवर महापौर जयश्री महाजन आणि पती सुनील महाजन यांची खडसें सोबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या महापौर जयश्री महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची भेट घेतल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!