Skip to content

मुलाचे पोट दुखतेय; जंतनाशक गोळी दिली का ?


द पॉइंट नाऊ: जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दर सहा महिन्यांनी घेतली जाते. या मोहिमेतंर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून सुमारे १८ लाख बालकांना जंतनाशक गोळी दिली जाते. मात्र, शहरी भागातील खासगी शाळेतील मुलांना ही गोळी शाळांतर्फे दिली जात नाही. अनेकदा शहरातही काही मुलांना सातत्याने पोटदुखीची समस्या असण्यामागे पोटात जंत हेच कारण असते. त्यामुळे किमान वर्षातून एकदा तरी मुलांना जंतनाशक गोळी देणे आवश्यक असते. यामध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येतात. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ही जंतनाशक गोळी खासगी शाळांतून दिली जात नाही. त्यामुळे सातत्याने पोटदुखी होणाऱ्या बालकांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन पालकांनी मेडिकलमधून त्या गोळ्या बालकांना देणे आवश्यक ठरते.

राज्य शासनातर्फे वर्षातून दोनदा वाटप

राज्य शासनाच्यावतीने वर्षभरातून दोनवेळा या जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. नाशिक जिल्ह्यात ही मोहीम एप्रिल महिन्यात झाली होती. त्यानंतर पुन्हा सहा महिन्यांनी अर्थात ऑक्टोबर महिन्यातच या मोहिमेचे आयोजन केले जाणार आहे.

वर्षभरात १८ लाख मुलांना वाटप

वर्षभरात जिल्ह्याच्या -ग्रामीण भागातील तब्बल १८ लाख विद्यार्थ्यांना या जंतनाशक गोळ्यांचे वाटप दरवर्षी केले जाते. काही विद्यार्थी त्या प्रक्रियेतून सुटले तरी घरोघरी जाऊन पुन्हा अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना या जंतनाशक गोळ्या दिल्या जातात.

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कार्यरत

जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५९२ उपकेंद्राअंतर्गत काम करणारे आरोग्य सेवक, सेविका यामध्ये सहभागी आहेत. ही मोहिमेच्या अंमलबजावणी करता जिल्ह्यांतील ३४६१ आशा सेविका, ५०९६ अंगणवाडी सेविका, ३७९० शासनमान्य शाळा, ४५० खासगी शाळा आणि ६४ महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

१ ते १९ वयोगटातील प्रत्येकाने वर्षातून दोनदा घ्या गोळी

■ अंगणवाडी, शासकीय शाळा, खासगी शाळा, महाविद्यालय यामध्ये १ ते १९ वयोग टातील सर्व मुलांना या गोळ्या देण्यात आल्या.

■ या दिवशी लाभ न घेतलेल्या मुलांना ही गोळी नंतर घरोघरी जाऊनही देण्यात येते.

शासकीय रुग्णालयातही मिळते मोफत

ग्रामीण भागात शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आणि गोळी न मिळालेल्या बालकांना दरवर्षी आशा, अंगणवाडी, कार्यकर्त्या, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण करून घरोघरी जाऊन ही गोळी देण्यात येते. तसेच शासकीय रुग्णालयातही ती मोफत मिळते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!