कंपनी कामगार बोनसने ‘मालामाल’

0
2

द पॉईंट नाऊ: कोविड या जागतिक महामारीचे मळभ दूर सारून उद्योगांनी -कात टाकली आहे. दिवाळी सणासाठी महिंद्र ॲण्ड महिंद्र कंपनीने अधिकतम १ लाख ४१ हजार तर सिएट कंपनीने ६५ हजार रुपये बोनस दिला आहे. अन्य कारखान्यांनी देखील सर्वोच्च आणि भरघोस बोनस दिल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले आहे. बाजारपेठेत सुध्दा चैतन्य निर्माण झाले आहे.

दोन वर्षांपूर्वी वाहन उद्योगांवर आर्थिक मंदीचे सावट होते. त्यात कोरोनाचे संकट कोसळले. यात कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. अनेक कामगारांचे रोजगार गेलेत. मोठ्या कारखान्यांनी व्हीआरएसच्या माध्यमातून कामगार कपात केली होती. त्यामुळे अस्थिरतेचे वातावरण पसरले होते. कोरोनातून सावरत उद्योगांची चाके पूर्ववत झालीत. अर्थचक्र गतिमान होऊ लागले. कामगारांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे. दिवाळी सणासाठी लहान, मोठचा उद्योगातील कामगारांना भरघोस बोनस मिळाला आहे. बोनस मिळाल्याने बाजारपेठेत देखील चैतन्य पसरले आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील वाहन उत्पादनात अग्रेसर असलेल्या महिंद्र अॅण्ड महिंद्र कंपनी व्यवस्थापन आणि युनियनचे अध्यक्ष एन.डी. जाधव, सरचिटणीस संजय घोडके, संजय घुगे,जितेंद्र सूर्यवंशी, अजित थेटे, सचिन मोरे, प्रकाश धनगरमाळी, संतोष सावकार यांच्यात झालेल्या बैठकीत ६५ हजार रुपये ते १ लाख २९ हजार रुपये सेवाज्येष्ठतेनुसार बोनस मिळणार आहे. दि. २० ऑक्टोबरला कामगारांच्या खात्यात बोनस जमा होणार आहे.

वाहन उद्योगांसाठी लागणारे टायरचे उत्पादन करणाऱ्या सिएट कंपनी व्यवस्थापन आणि युनियनचे स्थानिक अध्यक्ष भिवाजी भावले, कैलास धात्रक, विनय यादव, पोपट सावंत, आद्याशंकर यादव, प्रमोद बेले, पृथ्वीराज देशमुख, वाल्मीक भडांगे यांच्यात झालेल्या बैठकीत कामगारांना सेवा ज्येष्ठतेनुसार ५५ हजार ते ६५ हजार रुपये बोनस जाहीर झाला आहे. कामगारांना बोनस मिळवून देण्यासाठी सिटू युनियनने आघाडी घेतली आहे. कामगार कर्मचाऱ्यांना २०,००० ते ६०,००० एवढी बोनसची रक्कम मिळाली आहे. बोनस करार यशस्वी होण्यासाठी संबंधित कंपन्यातील व्यवस्थापनाची सकारात्मक भूमिका राहिली आहे. सिटू युनियनचे डॉ.डी.एल.कराड, सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, संतोष कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला होता.

काही ठराविक उद्योगांचे बोनस करार

• महिंद्र ॲण्ड महिंद्र : ६५ हजार ते १ लाख २९ हजार रुपये.

• सिएट कंपनी : ५५००० ते ६५००० रुपये.

• टीडीके इंडिया सातपूर रुपये २५००० ते ५७००० रुपये.

• बेल्लोटा अँग्रो सोल्युशन पूर्ण पगार गॅलेक्सी इंजिनिअरिंग          ५२०००

• गोल्डी प्रिसिजन, सातपूर २४००० रुपये.

• गोल्डी प्रिसिजन : २४,००० रुपये

• शेरिन ऑटो २४००० रुपये.

• चैतन्य फार्मा १९ टक्के.

• एफडीसी प्रा.लि. सिन्नर २८००० रूपये.

• ग्रोव्हर झेपा २१००० रुपये.

• सॅमसोनाईट ४०००० रुपये.

• डर्क इंडिया २०६००रुपये.

• सुमो ऑटोटेक १६५०० रुपये.

• अल्फ इंजि. ३५००० रुपये.

• इंफिल्युम इंडिया ५५००० रुपये.

• ल्युसी इलेक्ट्रिकल ३५४००० रुपये.

• तुषार प्रिसीकॉन २६००० रुपये.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here