अंधेरीत भाजपाला पराभवाची भीती ? म्हणून रचला पत्राचा डाव ? ; भाजप नेत्यांच्या भेटी नंतरच राज ठाकरेंचे पत्र कसे संशयाची पाल चुकचुकली

0
2

मुंबई : भाजपा विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना आमनेसामने आहे मात्र आता अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लट्टे यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे. दिवंगत आमदार हे चांगले कार्यकर्ते होते, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे ते साक्षीदार राहिले आहेत. भाजपने उमेदवार मागे घेतल्यास रमेश लटके यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

या पत्रानंतर मात्र विविध तर्क लावले जात आहेत, राज ठाकरेंनी नेमक आताच का हे पत्र पाठवले इतर वेळी निवडणुका झाल्या तेव्हा ठाकरेंनी पत्र का पाठवले नाही. असा सवाल देखील उपस्थीत होत आहेत. नेमक लटकेंबद्दल सहानुभूती की उद्धव ठाकरेंना सर्वसामान्य वाढता पाठींबा लक्षात घेवून भाजपाचा उमेदवार अडचणींत असल्याने उमेदवारी महागात पडेल व उद्धव ठाकरेंची ताकद निर्माण होईल यामुळे सावध पवित्रा घेत हे सर्व राज ठाकरे – फडणवीस यांनी घडवून आणलेले चित्र आहे हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशा स्थितीत भाजप आपले उमेदवार मुरजी पटेल यांचे नाव मागे घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उमेदवारही जाहीर झाला आहे, अर्जही भरले आहेत. या टप्प्यावर येऊन राज ठाकरे पत्र लिहित आहेत. हे एकट्याने ठरवता येणार नाही. त्याला भाजपचे मित्रपक्ष आणि वरिष्ठ नेत्यांशी बोलावे लागेल. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलावे लागेल. राज ठाकरे यांनी काल अचानक मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवास येथे भेट घेतली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे.

जे आम्ही केले ते तुम्हीही करा… असा सल्ला राज यांनी फडणवीसांना दिला

तेच धोरण आपण पक्षाच्या वतीने अवलंबत असून आपल्या वतीने उमेदवार उभे करत नसल्याचेही राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेऊन भाजपनेही ही परंपरा पाळली पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे यांना रामायणाचा सल्ला दिला

राज ठाकरेंच्या या पत्राला उत्तर देताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज ठाकरे ज्या संस्कृतीबद्दल बोलत आहेत आणि ज्या संवेदनशीलतेबद्दल बोलत आहेत, ते एकनाथ शिंदे समजून घेतील का? एकनाथ शिंदे समजून घेत असले तरी भाजप आणि फडणवीस त्यांचे ऐकतील का ? एकनाथ शिंदे फक्त हिंदुत्वाच्या नावावर बंड केल्याचे सांगतात. मग त्यांनी रामायणातील वस्तुस्थिती लक्षात ठेवावी की, लक्ष्मणाने आपल्या वहीणीसाठी किती बलिदान दिले आणि तुम्ही वहिनीच्या मार्गात अडथळा ठरत आहात?

ऋतुजा लटके म्हणता विरोधी पक्ष भाजप इतरांपेक्षा वेगळा’

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांनीच या संदर्भात सांगितले की, आतापर्यंतच्या पद्धतीनुसार आपली निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. पण यावेळी विरोधी पक्ष (भाजप) वेगळाच विचार करत आहे. उद्यापर्यंत भाजप आपला उमेदवार मागे घेईल, अशी आशा अजूनही आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here