Deola | देवळ्यात बिबट्याची दहशत; घरातून बाहेर पडणे झाले मुश्किल

0
34
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | तालुक्यातील खालप, वासोळ व लोहोणेर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. खालप शिवारात वास्तव्यास असलेल्या जिभाऊ देवरे या शेतकऱ्याच्या वस्तीवर घराशेजारी बांधलेल्या पारडूवर हल्ला करून मारून टाकले. तर रविवार (दि .१) रोजी सायंकाळी उशिरा लोहोणेर येथील वासोळ रस्त्यावरील गोकुळ कारभारी आहीरे यांच्या शेळीवर हल्ला करून तिला ठार मारले.

Deola | महावितरणाच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय; नव्या वेळापत्रकामुळे शेतकरी त्रस्त

Deola | बिबट्याच्या वावराचे गावात भितीचे वातावरण

या भागात बिबट्याची इतकी दहशत निर्माण झाली आहे की शेतात जाताना फटाके घेऊन जावे लागते. आधी फटका उडवायचा आणि मग शेतात कामाला सुरुवात करायची. शाळेत ये-जा करणाऱ्या मुलांना एकटे न पाठवता त्यांना ने-आण करण्याची सतर्कता बाळगली जात आहे. जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधण्याची सोय करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भागात पिंजरे लावत बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Deola | प्रवाशांच्या जीवाशी खेळ; देवळ्यात बसचे चाक निखळले

“शेतशिवारात राहत असलेले शेतकरी बिबट्याच्या वावरामुळे धास्तावले असून रात्रीच्या वेळी फारसे कुणी बाहेर फिरकत नाही. मक्याचे पीक मोठे असल्याने त्याला लपून बसायला भरपूर जागा आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.” — सुनील सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते) खालप ता.देवळा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here