Ajit Pawar : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून सर्वच पक्ष अगदी जोमाने तयारी करत असताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर जन्मान यात्रेतून विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अजित पवारांची हीच जन सन्मान यात्रा आज त्यांच्या बारामती मतदारसंघांमध्ये धडकली. भर पावसात ही जनसमान यात्रा सुरू असून अजित पवारांनी यावेळी बारामतीत रोडशो केला. या रोड शोमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अजित पवारांचे शेकडो समर्थक सहभागी होते. या रॅलीनंतर बारामती मधल्या मिशन हायस्कूल मैदानावर अजित पवारांची जाहीर सभा पार पडली. सभेच्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. तर आगामी विधानसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवत अजित पवार यांनी बारामतीकरांना साद घातली आहे.
Ajit Pawar | दादांनी जाहीर केलं काँग्रेसचे ‘हे’ आमदार फोडणार.?; नाशिकच्याही एकाचा समावेश?
Ajit Pawar | सभेमध्ये काय म्हणाले अजित पवार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीमध्ये सभा घेतली. या सभेमधून बारामतीकरांना पाठीशी राहण्यासाठी आवाहन केले आहे. “आज आम्हाला मंत्रिमंडळात संधी मिळाली म्हणून अनेक निर्णय घेता आले. बारामतीत देखील आता बदल होत आहे. हल्ली अनेक पवार घरी यायला लागलेत, कधी आले नाहीत, असे लोक म्हणतील पण आता ते पण पवार आणि हे पण पवार, मात्र पुढे काय करायचं हे मात्र तुमच्या हातात आहे.” असे म्हणत अजित पवारांनी जनतेला आवाहन केले.
Ajit Pawar | ‘तुम्हाला इथे झक मारायला ठेवलंय का?’; सर्वांसमोर पवारांनी अधिकाऱ्याला झापलं
“असेल हिम्मत तर पुढे या” – अजित पवार
मालवणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना दुर्दैवी होती आणि मी त्याबद्दल माफी ही मागितली पण या प्रकरणात ज्या कोणाची चूक असेल त्याला शोधून काढू ज्याने बांधकाम केले किंवा स्ट्रक्चरल ऑडिट देणारा जो कोणी चुकीचा असेल त्याला शोधून शिक्षा करून छत्रपतींच्या नावाला साधेस भव्य स्मारक पुन्हा उभारण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. “या घटनेवरून विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये. आता काहींनी जोडे मारो आंदोलन करत आमच्या फोटोला जोडे मारले अरे फोटोला कसली जोडी मारता हिम्मत असेल तर समोर या मीही बघतो हा काय रडीचा डाव आहे.” या भाषेत पवारांनी विरोधकांना चांगलेच सुनावले.
योजना कधीही बंद होणार नाहीत.
त्याचबरोबर “राज्यात २०८७ मतदारसंघांपैकी सर्वात जास्त विकास निधी बारामतीला दिला आहे. मी येत्या काळात बारामतीची ब्लू प्रिंट काढणार आहे. बारामतीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे. अनेक योजना भविष्यामध्ये आपल्याला राबवायच्या आहेत. लोकांची फक्त काम करण्याची धमक असली पाहिजे, नेतृत्व तसं असलं पाहिजे. हे सर्व आता तुमच्या हातात आहे.” असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले. “सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मलेल्यांना 1500 रुपयांची किंमत तरी काय? महायुती सरकार पुन्हा आल्यास योजना कायम सुरू राहणार आहे.” असे त्यांनी सभेत सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम