Nashik | ‘भरपाई देताय तर सांगा, नाहीतर रामराम!’ बांधावर गेलेल्या भुसेंना शेतकऱ्याने सुनावलं

0
14

Nashik |  “साहेब, अभ्यास करतो, समिती नेमतो हे काहीच सांगू नका. आम्ही आता वैतागलोय. भरपाई देणार असाल तर सांगा, नाहीतर रामराम!” अशा शब्दांत गारपिटीमुळे हतबल झालेल्या निफाडच्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांना सुनावले. पालकमंत्री भुसे यांनी कसबे आणि मौजे सुकेणे ह्या शिवारांतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकरी भारत मोगल यांनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची बाजू मांडताना ते अगतिक झाले.

निफाड तालुक्यात रविवारी झालेला वादळवारा, पाऊस व गारपिटीमुळे द्राक्षबागांच्या नुकसानीची जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुकेणे परिसरात, तर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रौळस पिंपरी या भागात पाहणी केली. शासकीय कर्मचाऱ्यांना तातडीने दोन दिवसांत ह्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर, निफाड, उगाव, शिवडी, पिंपळगाव, ओझर, दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे-सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपळस ह्या भागांत गारपीट व अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांसह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या ह्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. यावेळी कसबे सुकेणे येथील संतोष भंडारे, भारत मोगल यांच्या द्राक्षबागांची, तसेच महेश भंडारे यांच्या कांदा पिकाची पालकमंत्री भुसे यांनी पाहणी केली.

Court News | आरोपीला हजर करण्यास उशीर; कोर्टाने पोलिसांनाच सुनावली अजब शिक्षा

अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देशही भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल, त्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी देण्याचे आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी निफाडचे आमदार दिलीप बनकर, माजी आ. अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, यांसमवेत दिलीप मोरे, सरपंच आनंदराव भंडारे, ग्रामसेवक रवी अहिरे व अधिकारी तसेच ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.

डोळ्यांत अश्रू…

पीक हातात येण्याची वेळ आली आणि क्षणात डोळ्यांसमोर स्वप्नांचा चुराडा झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यावेळी गहिवरून आले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांनी धीर धरावा, स्वतःला सावरावे, असा आधार देत हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे आश्वासनही शेतकऱ्यांना दिले.

Mumbai | हजारो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर आज मंत्रालयावर धडकणार; बळाचा वापर केला तर.. तुपकरांचा इशारा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here