Skip to content

Milk Rate | नाशिक जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटात; मागणी घटल्याने दर घसरले


Milk Rate |  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा जोरदार तडाखा बसलेला असताना जिल्ह्यातील दूध उत्पादकही आता अडचणीत सापडले आहेत. महिनाभरात गायीच्या दुधाचे दर हे तब्बल दहा रुपयांनी घसरून आता २७ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

दुधाचा गुंतवणूक खर्चही भरून निघत नसल्याने दूध उत्पादकांना आता शासकीय मदतीची प्रतिक्षा आहे.

जिल्ह्यात दूध संकलन केंद्रांच्यामार्फत दीड लाख लिटर इतक्या गायीच्या दुधाचे संकलन होते. यातील साधारणत: ५० हजार लिटर दूध हे घरगुती वापरात येते. तर, १५ ते २० हजार लिटर दूध हे हॉटेल व्यवसायासाठी लागते. मिठाई बनवण्यासाठी ३० हजार लिटरपर्यंत दूध हे उपयोगात येते. याव्यतिरिक्त दुधाची पावडर ही बनवली जाते.

Nashik | ‘भरपाई देताय तर सांगा, नाहीतर रामराम!’ बांधावर गेलेल्या भुसेंना शेतकऱ्याने सुनावलं

या पावडरला साधारणत: ३०० रुपये किलो असा भाव मिळतो. पण मागील काही महिन्यांत हा भाव १९० रुपयांपर्यंत घसरल्यामुळे दुधाचे दरही घसरले आहेत. थंडी तसेच दुष्काळामुळे आईस्क्रीमची मागणी ही कमालीची घटली असल्याने दूध पावडरची मागणीदेखील घटली.

बहुतांश दूध संघांनी या पावडरचा साठा करून ठेवलेला आहे. पण दुधाचा पुरवठा कायम असल्याने दिवसेंदिवस दर हे घसरत आहेत.

त्यामुळे दूध उत्पादकांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला असून, सरकारने दूध उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी आता ह्या दूध उत्पादकांकडून होत आहे.

खर्च निघणेही अवघड

एका गाईला प्रति दिवस किमान आठ किलो खाद्य लागते. त्याशिवाय ६० किलो चाराही द्यावा लागतो. या दोन्हींचा खर्च हा तब्बल साडेपाचशे रुपयांपर्यंत पोहचतो. त्यामुळे गायीच्या एक लिटर दुधासाठी २५ ते ३० रुपये इतका खर्च होतो. सध्या मिळत असणाऱ्या दरातून हा खर्चदेखील भरून निघणे अशक्य आहे. दूध उत्पादकांना आता मजुरी म्हणून फक्त शेण मिळत आहे.

Court News | आरोपीला हजर करण्यास उशीर; कोर्टाने पोलिसांनाच सुनावली अजब शिक्षा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!