Skip to content

Court News | आरोपीला हजर करण्यास उशीर; कोर्टाने पोलिसांनाच सुनावली अजब शिक्षा


Court News |  पेट्रोलिंग करतांना पहाटे पकडलेल्या २ आरोपींना सकाळी ११ वाजता कोर्टात हजार करायचे होते. पण पोलिसांनी ऐवजी ११ वाजून ४५ मिनिटांनी म्हणजेच पाऊण तास उशीरा हजर केल्याने, न्यायदंडाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांना चक्क गवत कापण्याची शिक्षा सुनावली आहे.

मात्र, यामुळे पोलिसांत निराशेचे वातावरण निर्माण झाले असुन, न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या या शिक्षेविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश व पालक न्यायाधीश यांच्याकडे याबाबत तक्रार करत दाद मागितली आहे.

अधिक माहितीनुसार, २२ ऑक्टोबर रोजी मानवत पोलीस ठाण्याचे कर्मचारी हे शहरात रात्री पेट्रोलिंगवर होते. दरम्यान, पहाटे ३ वाजेच्या दरम्यान चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोनजण पोलिसांना दिसले. त्यामुळे कलम १२२ अंतर्गत ह्या दोघांना पोलिसांनी अटक केली. पण, त्या दिवशी रविवार असल्यामुळे या आरोपींना न्यायालयात हजर करण्याबाबत मानवत येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी ११ वाजता आणण्याबाबत कळवले होते. पण, काही कारणास्तव सदर पोलीस कर्मचाऱ्यांना न्यायदंडाधिकाऱ्यां समोर आरोपींना हजर करण्यास उशीर झाला. तर, ४५ मिनिट उशिरा हे पोलीस कर्मचारी न्यायालयात पोहचले.

Mumbai | हजारो शेतकऱ्यांसह रविकांत तुपकर आज मंत्रालयावर धडकणार; बळाचा वापर केला तर.. तुपकरांचा इशारा

तेव्हा न्यायदंडाधिकारी यांच्या समोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना हजर केले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना, न्यायदंडाधिकारी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मी तुम्हाला आरोपींना ११ वाजता हजर करण्यास सांगितले होते. पण, तुम्ही ११ वाजून ४५ मिनिटांनी आरोपींना हजर का केले? असा प्रश्न विचारला आणि उशीर झाल्याबद्दल त्यांनी पोलिसांना गवत काढण्याची शिक्षा सुनावली.

चुक वाटल्यास प्रशासनाकडे तक्रार देता आली असती…

आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी २४ तासांची मुदत असते. या मुदतीतच आरोपींना आमच्या कर्मचाऱ्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर हजर केले होते. नियमानुसारच पोलिसांनी हे काम केले होते. पण, तरीही न्यायदंडाधिकारी यांना जर काही चुकीचे वाटत असेल, तर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार किंवा त्याबद्दलचा अहवाल दिला असता, तर ते नियमातही झाले असते.

मात्र, पोलिसांचे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांना वर्दीत अशा प्रकारे गवत कापण्याची सुनावण्यात आलेली शिक्षा ही चुकीची आहे. त्यामुळे, आम्ही याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच पालक न्यायाधीश यांकडे तक्रार करून दाद मागितलेली असल्याचे पोलीस अधीक्षक आर. रागसुधा यांनी सांगितलेले आहे.

थेट शिक्षण मंत्रालयात नोकरी करण्याची संधी; आजच करू शकता अर्ज


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!