Tea | नवऱ्याने गरम चहा मागितला आणि बायकोने त्याच्या डोळ्यातच कात्री खुपसली

0
27
Tea
Tea

Tea |  हिवाळा ऋतु सुरू असून, या गुलाबी थंडीत सगळ्यांनाच गरमागरम वाफाळता चहा (Tea) प्यायला सगळ्यांनाच आवडतं. मात्र हा वाफाळता आणि गरमागरम चहा मागणं हे एका नवऱ्याला फार महागात पडलंय. या व्यक्तीला १ कप चहामुळे त्याचा डोळा गमवावा लागणार आहे. उत्तर प्रदेश राज्यातील बागपत येथुन ही धक्कादायक बाब समोर आली आहे.  दरम्यान, येथे एका पतीने त्याच्या पत्नीकडे गरम वाफाळता चहा मागितला असता, त्याच्या प्रचंड चिडलेल्या पत्नीने हातातली कात्री ही थेट त्याच्या डोळ्यात खुपसली आणि यामुळे त्या पतीचा डोळा हा चंगलाच जखमी झाला. (Tea)

दरम्यान, यामुळे जखमी पती हा वेदनेच्या भरात जोरजोरात किंचाळू लागला. पण यानंतरही त्याच्या निर्दयी पत्नीला त्याची काहीही दया आली नाही आणि जखमी पतीला तसंच वेदनेत विव्हळत सोडून तिने घरातून पळ काढला. यानंतर ती फरार झाली आहे. यावेळी संबंधित जखमी पतीचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याची वहिनी व पुतणे तिथे धावत आले. आणि यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. या पीडित व्यक्तीला पुढील उपचारांसाठी मेरठ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Tea)

Uddhav thackrey | ‘मविआ’त वाद चिघळले; ठाकरे-काँग्रेसमध्ये खंडाजंगी..?

Tea | लग्नाला फक्त तीनच वर्ष 

या प्रकरणी, जखमी पतीचे नाव हे अंकित आहे. हा २८ वर्षांचा असून, बडौत येथील रहिवासी आहे. अंकित याचा तीन वर्षांपूर्वीच रमाला ठाणे क्षेत्रातील सूप या गावातील एका मुलीशी विवाह झाला होता. दरम्यान, यांच्या लग्नानंतर काही काळ सगळं सुरळीत सुरू होतं. मात्र, मागील दीड वर्षांत दोघांचे मतभेद होऊ लागले आणि यामुळे त्यांच्यात वाद उद्भवू लागले. त्यांच्यात मारहाण देखील होत असायची. दरम्यान, अंकित याने त्याच्या पत्नीकडे गरमागरम चहा मागितला असता, ती रागात खोलीत गेली आणि तेथून ती हातात कात्री घेऊन आली व सोफ्यावर बसलेल्या तिच्या पतीच्या डोळ्यात तिने थेट ती हातातील कात्री खुपसली. (Tea)

Breaking | त्र्यंबकरोडवर लॉजिंगच्या आड चालणारे अश्लिल चाळे होणार बंद!

नवऱ्याला जखमी सोडून ती पसार 

दरम्यान, पतीच्या डोळ्यात कात्री खुपसल्या नंतर तो जखमी झाला व वेदनेने विव्हळू लागला. त्यामुळे आरोपी पत्नी घाबरली. तसेच यावेळी पकडल्या जाण्याच्या भीतीने तिने घरातून पळ काढला आणि ती फरार झाली आहे. इकडे जखमी पतीच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने प्राथमिक उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, त्याच्यावर पुढील उपचारांसाठी त्याला मेरठ येथील खाजगी रुग्णालय हलवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे. (Tea)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here